Dhamma Chakra Pravartan Din 2024 : बौद्ध धर्मात दसऱ्याला विशेष महत्व का आहे? वाचा या दिवशी नेमकं काय घडलं

Dhammachakra Pravartan Din : धम्मचक्र प्रवर्तन दिन दसऱ्याला का साजरा करतात? काय आहे या मागची कथा? याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
Dhammachakra Pravartan Din : धम्मचक्र प्रवर्तन दिनी नेमकं काय घडलं?
Dhamma Chakra Pravartan Din 2024Saam TV
Published On

दसरा सण यंदा शनिवारी म्हणजे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा केला जाणर आहे. या सणाला राज्यात विशेष महत्व आहे. दसरा साजरा करताना हिंदू धर्मीय एकमेकांना आपट्याची पाने सोन्याच्या स्वरुपात वाटतात. आपट्याची पाने वाटताना शुभ दसरा अशा शुभेच्छा सुद्धा दिल्या जातात. अशात बौद्ध धर्मात देखील या दिवशी एक सण साजरा केला जातो. त्यामुळे आज आपण याच सणाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Dhammachakra Pravartan Din : धम्मचक्र प्रवर्तन दिनी नेमकं काय घडलं?
Shivrajyabhishek Din 2024: फुलांची आरास, मैदानी खेळांसह शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात; रायगडावर हजारो शिवप्रेमींची गर्दी

बौद्ध धर्मात धम्मचक्र प्रवर्तन दिन दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी हा सण बौद्ध धर्मीय व्यक्ती मोठ्या आनंदात साजरा करतात. या सणानिमित्त बौद्ध अनुयायी मोठ्या श्रद्धेने एकत्र येतात. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करतात. त्यानंतर त्रिशरण पंचशील गायले जाते. विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या महाकारूणी तथागत गौतम बुद्धांचे स्मरण आणि पुजन केले जाते.

या दिवशी काय घडलं?

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमधील दीक्षाभूमी येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. काळासह पडद्याआड चाललेल्या या धर्माचा बाबासाहेबांनी पुन्हा प्रसार करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांच्यासह लाखो नागरिकांनी या धर्माचा स्वीकार केला. बाबासाहेबांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, असं म्हणत शांतीचा मार्ग सांगणारा बौद्ध धर्म स्विकारला होता.

हा धर्मांतरण सोहळा अशोक विजयादशमीला काही अनुयायी साजरा करतात. तर काही व्यक्ती तारखेप्रमाणे १४ ऑक्टोबर हा सण साजरा करतात. १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी जमा होतात. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गतिमान म्हणजेच "धम्मचक्र प्रवर्तन" केले. या दिवसाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असंही म्हटलं जातं.

Dhammachakra Pravartan Din : धम्मचक्र प्रवर्तन दिनी नेमकं काय घडलं?
Maharashtra Din 2024 Importance: जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com