Dussehra 2024 : दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने का वाटली जातात? वाचा यामागची रंजक कथा

Dussehra Aptychi Pane : दसऱ्याला आपट्याची पाने का वाटली जातात? या मागची कथा काय आहे? याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Dussehra 2024
Dussehra 2024Saam TV
Published On

दरसा या सणाला राज्यात फार मोठं महत्व आहे. नवरात्रीनंतर शेवटचा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो. घरात प्रत्येक व्यक्ती सुंदर कपडे परिधान करतात. तसेच घरी गोड पदार्थांचे जेवण बनवले जाते. सायंकाळी प्रत्येक व्यक्ती आपट्याची पाने वाटतात. आपट्याची पाने सोनं म्हणून वाटली जातात. आता आपट्याचीच पाने सोनं म्हणून का वाटली जातात? यामागची एक रंजक कथा आज जाणून घेणार आहोत.

Dussehra 2024
Shiv Sena Dasara Melava: उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...

कथा

एकदा गुरू वरतंतू आपल्या कौत्स शिक्ष्यासह बसले होते. त्यावेळी कौत्सने त्यांना विचारले की गुरूजी तुम्ही आम्हाला खुप काही शिकवले त्या बदल्यात मी तुम्हाला काहीच दिलेले नाही. तुम्ही अद्यापही माझ्याकडून कोणतीही गुरुदक्षिणा घेतलेली नाही. त्यामुळे तुम्हाला काय देऊ हे तुम्ही मला सांगा.

त्यावर गुरुजी म्हणाले की, मी फक्त तुला ज्ञान दिले आहे आणि ज्ञान अशाच पद्धतीने वाटायचे असते. त्याचा असा बाजार नसतो करायचा. ज्ञानाचं मूल्य ठरवणे कठीण आहे. मात्र गुरुजींचं हे म्हणणं कौत्सला पटेना. त्याने गुरू वरतंतू यांच्याकडे याबद्दल पुन्हा विचारणा केली. तसेच तुम्हाला काय देऊ सांगा, असा हट्ट केला होता.

त्यावर गुरू त्यासा म्हणाले की, मी तुला चौदा विद्या शिकवल्या आहेत. त्यामुळे तू मला १४ कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन दे. हे ऐकूण कौत्स खुश झाला त्याला वाटले हे काम आपण सहज करू शकतो. मात्र त्याला एवढ्या जास्त सुवर्ण मुद्रा जमवणे कठीण झाले. त्यामुळे त्याने रघुराजाकडे धाव घेतली. आपली माहिती त्याला सांगूण सुवर्ण मुद्रांची मागणी केली.

त्यावेळी राजाकडे काहीच मुद्रा शिल्लक नव्हत्या आणि त्याला कौत्सला नाराज करायचे नव्हते. त्यामुळे त्याने त्याला नंतर ३ दिवसांनी ये असं सांगितलं. तसेच लगेचच कुबेराला वसुलीसाठी निरोप दिला. मात्र धन मिळालं नाही. त्यामुळे रघुराजाने युद्धाची तयारी सुरू केली.

इंद्राला ही दोष्ट समजताच तो घाबरला त्याने रघुराजाच्या नगरीच्या वेशीवरील आपट्याच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्यास सांगितलं. राजाने हा पाऊस पाहिला आणि कौत्सला हे धन घेऊन जा असं सांगितलं. मात्र कौत्सने यातील केवळ गुरूंना पाहिजे होतं तेवढंच धन घेतलं. त्यानंतर उरलेलं धन राजाने प्रजेला वाटून दिलं. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी व्यक्ती आपट्याची पाने सोनं म्हणून वाटू लागली, अशी कथा आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Dussehra 2024
Dasara Melava : आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा आझाद मैदानावर होतोय; CM शिंदेंनी सांगितलं दसरा मेळावा शिवतीर्थावर का नाही?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com