Shivrajyabhishek Din 2024: फुलांची आरास, मैदानी खेळांसह शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात; रायगडावर हजारो शिवप्रेमींची गर्दी

Shivrajyabhishek Din 2024 Celebrated On Raigad: आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त रायगडावर मोठ्या उत्साहात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Shivrajyabhishek Din 2024
Shivrajyabhishek Din 2024Saam Tv

सचिन कदम

महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ३५१ वा शिवराज्यभिषेक सोहळा आहे. यानिमित्त स्वराजाची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला स्वराज्य मिळवून दिले. ६ जून १६७४ रोजी शिवाजी महारांजाचा राज्यभिषेक सोहळा झाला. त्यानंतर हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो.

आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. फुलांची आरास, ढोल-ताशे, मर्दानी खेळ असे कार्यक्रम आज रायगडावर होणार आहे. रायगडावरील हा सोहळा खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. दोन दिवस साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी खूप मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

काल संध्याकाळी रायगडावर देव-देवतांचे पूजन, मर्दानी खेळांनी सोहळ्याला सुरुवात झाली. आज संपूर्ण दिवस रायगडावर वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार आहे. यासाठी रायगडावर फुलांची आरास करुन सजावट करण्यात आली.

रायगडावर शिवप्रेमींनी पारंपारिक वेशभूषा करुन गर्दी केली आहे. या सोहळ्याला छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील राहणार आहेत. तर रोहित पवार आता रायगडावर उपस्थित झाले आहेत.

Shivrajyabhishek Din 2024
Maharashtra Weather Forecast: वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा; केव्हा आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर

कोल्हापूरातदेखील शिवराज्यभिषेक सोहळा साजरा

कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. थोड्याच वेळात या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होईल.नवीन राजवड्याच्यावर जाणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आर्मी बँड, शाहिरी पोवाडा,ढोल वाद्य सादरीकरण होणार आहेत. शाहू महाराज नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत.त्यामुळे नवीन राजवाड्यावर नागरिकांची गर्दी असणार आहे.

Shivrajyabhishek Din 2024
Saamna च्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल! केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा !

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com