Dussehra 2022 Saam TV
लाईफस्टाईल

Dussehra 2022 : दसऱ्याच्या दिवशी 'या' भव्य ठिकाणी घडेल दुर्गादेवीचे दर्शन

कोमल दामुद्रे
Dussehra 2022

दसऱ्याच्या दिवशी दुर्गा पूजा किंवा रावण दहनाचा कार्यक्रम अनेक ठिकांणी पाहायला मिळतो. काही ठिकाणी हा उत्सव अगदी थाटामाटात साजरा करतात. कुठे जत्रा भरते तर कुठे गरबा (Garba) खेळला जातो. अशा ठिकाणी अनेकांना जाणे आवडते. यासाठी अशाच काही ठिकाणांबद्दल सांगण्यात आले आहे जिथे भव्य जत्रेचे आयोजन केले जाते. दसरा मेळ्यासाठी तुम्ही या ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

Kolkata

पश्चिम बंगालमध्ये असलेल्या कोलकात्याच्या दुर्गापूजेला हजेरी लावण्यासाठी लोक लांबून येतात. इथे दुर्गापूजा आणि दसऱ्याचा वेगळा उत्साह आहे. दसऱ्याच्या दिवशी स्त्रिया सिंदूरमध्ये खेळतात. रसगुल्ला आणि मिष्टी डोई यांसारख्या स्वादिष्ट स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला जातो.

Kullu - Himachal Pradesh

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्येही दसऱ्याचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कुल्लू व्हॅली अतिशय सुंदरपणे सजवली जाते. देवतांच्या मूर्ती जमिनीवर नेण्यासाठी मिरवणूक काढली जाते. व्यास नदीच्या काठावर लंका दहन करून उत्सवाची सांगता होते. त्यात सहभागी होण्यासाठी लांबून लोक येतात.

Ahmedabad

गुजरातमधील अहमदाबादमध्ये दसरा उत्साहात साजरा केला जातो. येथे मोठी जत्रा भरते. रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेले सुंदर दृश्य तुमचे मन मोहून टाकेल. महिला आणि पुरुष सुंदर पोशाख घालून गरबा खेळतात. येथे दसऱ्याचा भव्य उत्सव आयोजित केला जातो.

Varanasi

वाराणसीत दसऱ्याच्या सणाला वेगळीच धूम असते. येथे रामलीलाचे प्रदर्शन पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. हे दृश्य खूप सुंदर आहे. तुम्हीही येथे दसरा (Dasara) उत्सवात सहभागी होऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : शेतकरी हतबल...मनावर दगड ठेवून पिकावर फिरविला रोटोव्हेटर; दीड एकरातील अद्रकवर रोगाचा प्रादुर्भाव

IND vs BAN: बुमराहच्या गोलंदाजीवर बांगलादेशचा नागिण डान्स; संपूर्ण संघ १४९ धावांवर गारद, टीम इंडियाकडे मोठी आघाडी

Aaradhya Bachchan Net Worth : 13 वर्षांची आराध्या बच्चन आहे कोट्यवधींची मालकीण, संपत्तीचा आकडा किती?

Phullwanti: प्राजक्ता माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT