Dussehra 2022 : शमीच्या पानांचे चमत्कारिक महत्त्व, दसऱ्याच्या दिवशी मानले जाते अधिक शुभ

दसऱ्याच्या दिवशी खरेतर आपट्याच्या पानांना अधिक महत्त्व असते. परंतु, त्यासोबतच शमीच्या पानांना देखील अधिक महत्त्व दिले जाते.
Dussehra
DussehraSaam Tv
Published On

Dussehra 2022 : धार्मिक व पौराणिकतेनुसार आपल्या घरात अनेक औषधी वनस्पती असतात. त्यातील एक शमी. याचे पाने अनेक धार्मिक कार्यात वापरली जातात. हिची पाने गणपतीला वाहतात. दसऱ्याच्या दिवशी खरेतर आपट्याच्या पानांना अधिक महत्त्व असते. परंतु, त्यासोबतच शमीच्या पानांना देखील अधिक महत्त्व दिले जाते.

शारदीय नवरात्रीच्या (Navratra) 10 व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. या दिवशी रामाने लंकापती रावणाचा वध केला. धार्मिक मान्यतांनुसार, श्रीराम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह 14 वर्षे वनवासात होते. मग दुष्ट, अहंकारी रावण, भगवान श्रीरामाच्या झोपडीत ऋषींच्या वेशात, माता सीतेचे अपहरण करुन आणि तिला लंकेला घेऊन जातो.

Dussehra
Shardiya Navratri 2022 : नवरात्रीत कलशावर नारळ का ठेवला जातो ? तुम्हाला माहित आहे का?

लंकेवर हल्ला करण्यापूर्वी श्रीरामांनी शमीच्या झाडापुढे नतमस्तक होऊन आपल्या विजयासाठी प्रार्थना केली. त्यानंतर श्रीरामाने रावणाचा वध केला. तेव्हापासून असे मानले जाते की केवळ शमीच्या पानांना स्पर्श केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास आणि समस्या दूर होतात.

Dussehra
Seventh Day Of Navratri 2022: सातव्या माळेला देवी कालरात्रीचा दिवस; जाणून घ्या, मंत्र आणि पूजा विधी

असे मानले जाते की, घरात (Home) शमीचे झाड लावल्याने देवतांचा आशीर्वाद नेहमीच राहतो. यासोबतच शमीचे झाड शनिदेवाच्या कोपापासून रक्षण करते. शमीची पाने वाटल्याने घरात सुख-समृद्धी येते. शमी वृक्षाचा महिमा पुराणात पुष्कळ सांगितला आहे.

शमीच्या झाडाची फळधारणा पाहून त्यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे की नाही, याचाही अंदाज येऊ शकतो. शमीचे झाड घराच्या ईशान्य दिशेला लावावे.

वास्तुशास्त्रानुसार रोज शमीच्या झाडाखाली दिवा लावल्यास शनिदेवाचा कोप टाळता येतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com