Relationship Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : कामाच्या ताणामुळे जोडीदाराला वेळ देता येत नाहीय? 'असा' करा टाईम मॅनेज मग येईल नात्यात गोडवा

Time Management Skills : कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे जोडीदाराला वेळ देता येत नसल्यास चिडचिड करण्यापेक्षा 'या' सिंपल टिप्स फॉलो करा आणि टाईम मॅनेज करून निवांत वेळ घालवा.

Shreya Maskar

आजकाल कामाचा ताण एवढा वाढला आहे की, कुटुंबाला, जोडीदाराला, मित्रमंडळींना वेळ देता येत नाही. आपली देखील त्यावरून खूप चिडचिड होते. यामुळे नाती बिघडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कितीही कामात व्यस्त असल्यास आपल्या प्रियजनांना आवर्जून वेळ द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. आपल्या जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी वेळेचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे.

फूड डेट प्लान करा

वेळ न देत असल्यामुळे जोडीदारासोबत भांडण होत असेल, तर जोडीदारासाठी मस्त फूड डेट प्लान करा. कारण सर्व प्रश्नाच उत्तर किंवा मनाच समाधान चविष्ट जेवणातून होते. तुम्ही त्यांच्या आवडीचे जेवण किंवा एखादा पदार्थ बनवून घेऊन येऊ शकता. तसेच ही डेट संध्याकाळची करा. यामुळे तुम्हाला कामातून वेळ देखील मिळेल आणि संध्याकाळचे वातावरण देखील चांगले असते. तुमच्या हातून दोन घास खाल्ल्यानंतर जोडीदाराचा राग मिनिटांत दूर होईल आणि तुमच्यात छान संवाद घडेल.

कामाचा राग जोडीदारावर काढू नका

आपल्याकडून कळत नकळत बऱ्याच वेळा जोडीदारावर कामाचा राग काढला जातो. किंवा आपली कामावरून चिडचिड होते. हे होणे टाळा. कारण तुम्ही जोडीदारासोबतही कामाच्या गोष्टी करत असाल तर त्याला वेळ कधी देणार त्यामुळे जोडीदाराशी वेळ मिळेल तसा प्रेमाच्या गप्पा मारा. या सवयीमुळे नातं खराब होत. जोडीदारासमोर आपले मन हलके करा. त्यामुळे तुमचे मन शांत होईल. मात्र भांडण करू नका.

संवाद महत्त्वाचा

कामामुळे भेटीगाठी होत नसल्या तरी संवाद थांबायला नको. त्यामुळे रोज आपल्या जोडीदारासोबत बोला. मेसेज वर बोलण्यापेक्षा फोनवर बोला. कारण संवाद थांबल्यावर गैरसमज होतात. जोडीदाराबरोबर आपल्या आयुष्यात काय घडत आहे याचे अपडेट देत रहा. यामुळे तुमचे प्रेम आणि तुमच्या आयुष्यातील त्यांचे महत्त्व स्पष्ट होते. कामाचा ताण त्यांना नीट समजून सांगा. जेणेकरून जोडीदार तुमच्याविषयी नकारात्मक विचार करणार नाही.

तुलना करू नका

आपला जोडीदार आपल्याला वेळ देत नसेल तर त्याची इतरांसोबत तुलना करू नका. त्याला समजून घ्या आणि वेळ द्या. तुम्ही त्यांचा ताण कमी करायला हवा ना की तुमच्या भांडणांमुळे त्यांचा ताण वाढेल. जोडीदाराचे दोष काढण्यापेक्षा परिस्थितीवर उपाय शोधा आणि प्रेमाने रहा. त्यांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

Soybean Side Effects : सोयाबीन कोणत्या व्यक्तींनी खाणं टाळावं?

SCROLL FOR NEXT