Dry Lemon Kitchen Hacks Saam Tv
लाईफस्टाईल

Dry Lemon Kitchen Hacks : सुकलेल्या लिंबाला फेकून देताय ? घरातील काळया कुट्ट टाइल्स, सिंक करता येतील स्वच्छ; कसे ते पाहा

Cleaning Hacks : लिंबाचा सर्वाधिक वापर लिंबू पाणी, लोणचे, स्वाद किंवा एखाद्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो.

कोमल दामुद्रे

Kitchen Hacks : लिंबू हा आपल्या स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ आहे, ज्याच्या आपल्याला आरोग्याला फायदा तर होतोच पण त्याच्यामुळे आपले स्वयंपाकघर स्वच्छ देखील राहाते. लिंबाचा सर्वाधिक वापर लिंबू पाणी, लोणचे, स्वाद किंवा एखाद्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो.

बरेचदा आपल्या फ्रीजमध्ये (Fridge) आपण लिंब (Lemon) भरुन ठेवतो पण काही काळानंतर ही लिंब सुकतात व आपल्याकडे टाकून देण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही. परंतु, याच सुकलेल्या लिंबाचा आपल्या स्वयंपाकघरात अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होतो. जाणून घेऊया कसा ते...

1. किचन टाइल्स

कितीही महागडा डिशबार वापरुनही किचन टाइल्सही काळी कुट्ट राहात असेल तर तुम्ही सुकलेल्या लिंबाचा वापर करु शकता. यासाठी एका भांड्यात पानी घेऊन सुकलेल्या लिंबाचे बारीक तुकडे करुन उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर स्क्रबरच्या मदतीने टाइल्स स्वच्छ करा.

2. सिंक स्वच्छ करणे

भांडी धुतल्यानंतर सिंकमधून वास येऊ लागतो किंवा त्यात घाण जमा होते. लिंबू हा स्वच्छतेसाठी चांगला समजला जातो. किचन सिंक साफ करण्यासाठी बेकिंग सोड्यामध्ये मीठ व पाणी मिसळून सिंक स्वच्छ करु शकता. यामुळे सिंकमधून येणारा वासही जाईल व सिंक पुन्हा नव्यासारखा चमकेल.

3. कचऱ्याच्या डब्याचा वास

खराब झालेल्या लिंबाला फेकून देण्याऐवजी आपण त्याच्या सालीला कचऱ्याच्या डब्यात ठेवू शकतो. यासाठी लिंबाचे २-३ तुकडे करुन गरम पाण्यात उकळवून घ्या. त्यात चिमुटभर मीठ व डिटर्जेंट घालून मिक्स करा व कचऱ्याचा डब्बा स्वच्छ करा.

4. मसाल्याच्या डब्ब्यांवर असणारे तेलाचे व मसाल्याचे डाग

आपल्या टिफिन बॉक्सला मसाल्याचे किंवा तेलाचे डाग चिकटून राहातात. कितीही घासले तरी ते जात नाही. अशावेळी आपण सुकलेल्या लिंबाची पावडर करुन हव्या त्यावेळी त्याचा सोप म्हणून वापर करु शकतो. यामुळे तेलाचे डागही जातील व वासही येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT