which summer drink is benefit for diabetes ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पेय फायदेशीर ठरतील

मधुमेह असणाऱ्या रुग्ण उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी कोणतेही पेय पिऊ शकत नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढते तापमान आणि उन्हाळा सुरू असल्यामुळे थंड आणि ताजे पेय घेणे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरते. यातील अनेक पेये हेल्दी आणि हायड्रेट करण्यासाठी आपण पितो. पण असे पेय मधुमेहांच्या रुग्णांसाठी चांगले नसते. अशा पेयांमधे साखरेचे (Sugar) प्रमाण अधिक असल्यामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना हायड्रेटेड ठेवणे कठीण होते.

हे देखील पहा -

मधुमेह असणाऱ्या रुग्ण उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी कोणतेही पेय पिऊ शकत नाहीत. परंतु, आम्ही अशाच महत्त्वाच्या पेयांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असेल आणि उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासूनही आपले संरक्षणही होईल.

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या पेयाचा आपल्या आहारात समावेश करावा.

१. लस्सी -

लस्सी हे उन्हाळ्यातील थंडगार पेय आहे. उन्हाळ्यात मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी लस्सी प्यायल्यास डिहायड्रेशनपासून आराम मिळतो. त्यासाठी दही, पाणी (Water), काही बर्फाचे तुकडे आणि जिरे पावडर घ्या. ते सर्व एकत्रित मिसळा. याचा आस्वाद मधुमेही रूग्ण घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही.

२. बेल सरबत-

बेल हे फायबर, लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि फॉलिक अँसिडचे उत्तम स्रोत आहे. तसेच, बेलाचे सरबत प्यायल्यामुळे पोट थंड राहाते. मधुमेहापासून त्रस्त असणाऱ्या लोकांनी उन्हाळ्यात बेल सरबत प्यायल्यास खूप फायदेशीर ठरू शकते.

३. सत्तू -

सत्तू मधुमेहाच्या रुग्णांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करते. यात कोणतेही कर्बोदके नसतात. सत्तू हा पदार्थ अनेक डाळींपासून बनवला जातो. थंड पाण्यात सत्तू, थोडे काळे मीठ आणि लिंबाचे काही थेंब पिळून उन्हाळ्यात या पेयाचा आनंद घेऊ शकता.

४. आले आणि लिंबू पेय-

आलं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे उत्तम उन्हाळी पेय ठरु शकते. पाण्यात लिंबू आणि किसलेले आले घालून पेय बनवा आणि स्वतःला हायड्रेट ठेवा.

या पेयांचे सेवन करुन उन्हाळ्यात आपण डिहायड्रेशनपासून सुटका मिळवू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साहेब, आमच्यावर दादागिरी होतेय, मी...; उद्योगमंत्री उदय सामंतसमोर शेतकऱ्याचा संताप | Video Viral

Hair Care: स्ट्रेट, कर्ली की वेव्ही? तुमच्या केसांच्या प्रकारानुसार निवडा 'हा' परफेक्ट कंगवा

ध्वजारोहण करून परतत होता, वाटेतच काळाने गाठलं; भाजप नेत्याच्या मुलाचा अपघातात मृत्यू

मोठी बातमी! राज्यात १,४४० डॉक्टरांची नियुक्ती लवकरच होणार; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Kasara Tourism : धुक्याची चादर, फेसाळलेला धबधबा अन् हिरवागार निसर्ग; कसाराजवळची 'ही' ठिकाणं पावसाळी पिकनिकसाठी खास

SCROLL FOR NEXT