32 Degrees Of Dr. Babasaheb Ambedkar Saam TV
लाईफस्टाईल

32 Degrees Of Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांजवळ किती Degrees होत्या? वाचा सविस्तर

Dr. Bhimrao Ambedkar : लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 'डॉक्टर ऑफ ऑल सायन्सेस' ही दुर्मिळ डॉक्टरेट पदवी मिळवणारे बाबासाहेब जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Dr. Bhimrao Ambedkar Jayanti :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या संघर्षाने उच्च शिक्षण घेतलं. तसेच आपल्या समाजासह भारत देशाचा विकास केला. बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक भाषांचं ज्ञान घेतलं, काही विषयांमध्ये पीएचडी केली. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या मिळवल्या होत्या.

द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगभरात बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव होतो. जगभरात त्यांना बुद्धीसम्राट आणि महामानव म्हणून ओळखलं जातं. अशा डॉ. बाबासहेब आंबेडकरांजवळ एकून किती डिग्र्या होत्या? त्या कोणत्या होत्या हे आजही अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आज १३३ व्या जयंतीनिमित्त याबाबत माहिती जाणून घेऊ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलीत समाजात जन्माला आले. त्याकाळी दलितांना शिक्षणापासून दूर ठेवले जात होते. त्यामुळे बाबासाहेबांनी सुरुवातीला शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं. अशा परिस्थितीत शिक्षण घेऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या प्राप्त केल्या.

यामध्ये बीए, बॅरिस्टर इन लॉ, डीएससी, एलएलडी आणि डी.लिट. अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ पदव्यांचा समावेश आहे. साल १८९६ ला बाबासाहेबांचं शालेय शिक्षण सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये सुरू झालं. त्यानंतर १९००मध्ये त्यांनी सातारा हायस्कूल येथे पाचवीत प्रवेश घेतला.

मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी अकरावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे उस्मानिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ८ वर्षांचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी अवघ्या २ वर्ष आणि ३ महिन्यांत पूर्ण केला.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून 'डॉक्टर ऑफ ऑल सायन्सेस' ही दुर्मिळ डॉक्टरेट पदवी मिळवणारे बाबासाहेब जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत. इतकंच काय तर बाबासाहेबांना तब्बल अकरा भाषेचं देखील ज्ञान होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT