Fashion Tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Fashion Tips : उंची कमी असणाऱ्या मुलींनो हे कपडे परिधान करु नका!

उंची कमी असेल तर कपडे कसे परिधान कराल .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उंची कमी असो की, जास्त त्यामुळे भलेही आपल्या व्यक्तिमत्वावर फरक पडत नसला तरी, पण फॅशन ट्रेंड (Trend) फॉलो करताना आपण जर काही निष्काळजीपणा करत असाल तर त्यामुळे आपला लूक खराब होऊ शकतो. आम्ही आज काही फॅशन (Fashion) ट्रेंडबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची उंची अधिक चांगल्या प्रकारे दाखवू शकता आणि ट्रेंडही जपू शकता.

हे देखील पहा -

कमी उंचीच्या मुलींनी (Girls) कपडे, बॅग आणि शूज निवडण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

कमी उंचीच्या मुलींसाठी फॅशन टिप्स

१.राउंड टो हिल्सपासून दूर रहा -

चप्पल किंवा शूज निवडताना गोल टो हिल्स खरेदी करत असाल तर ते आपल्याला छान दिसतील पण आपले पाय लहान दिसू शकतात. अशावेळी आपली उंची कमी असेल तर गोल टो हिल्स असलेले शूज शक्यतो टाळावेत. पॉइंटेड टो हिल्स घालावे. स्टायलिश दिसण्यासोबतच तुमचे पायही लांब दिसतील.

२. मोठ्या आकाराची बॅग -

आपली उंची कमी असेल तर बॅग निवडताना काळजी घ्यावी. मोठ्या आकाराची बॅग बाळगली तर आपले शरीर लहान दिसू शकते. तसेच, मोठ्या आकाराची बॅग सध्या फॅशनमध्ये आहे. अशा बँगामध्ये आपण बर्‍याच गोष्टी सहजपणे कॅरी करू शकता. जर आपण अनेक वस्तू बॅगेत ठेवत असू तर मध्यम आकाराची बॅग निवडावी. यामुळे उंची कमी होणार नाही.

३.मोठ्या आकाराची सैल जीन्स

मोठ्या आकाराच्या जीन्स आवडत असेल तर आपली उंची कमी दिसेल. जरी ती आरामदायक आणि सुंदर लुक देत असली तरी ती घालणे शक्यतो टाळावे. जर उंची कमी असेल तर मोठ्या आकाराची जीन्स घालू नका. याला पर्याय म्हणून आपण हेवी जीन्स कॅरी करु शकतो. यामुळे पाय लांब दिसतील आणि एकंदर व्यक्तिमत्व सुधारेल

४. मिडी ड्रेस टाळा

कमी उंचीच्या मुलींना मिडी ड्रेस किंवा स्कर्ट घालायला आवडत असेल तर शक्यतो ते टाळावे. यामुळे उंची कमी दिसू शकते. स्कर्टसोबत टॉप किंवा शर्ट चांगला दिसत असला तरी कमी उंचीच्या मुलींनी मिडी लेन्थ स्कर्ट घातला तरी पाय खूपच छोटे दिसतात. जरी स्कर्ट आवडत असतील तर लहान किंवा लांब लांबीचे स्कर्ट घेऊ शकता. यामुळे पाय लांब दिसतील व उंचीही दिसेल.

अशाप्रकारे फॅशन ट्रेंड सांभाळून आकर्षक दिसू शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT