ऑफिसमध्ये या गोष्टी करु नका नाही तर वाढेल वजन !

ऑफिसमध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये.
Don't do these things in office
Don't do these things in officeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपण सगळेच जण आपल्या वजनाच्या बाबतीत सतर्क असतो. काही जण रोज व्यायाम किंवा मॉर्निग वॉक करून आपले वजन घटवण्याचा प्रयत्न करतात तर काही डाएट करतात. परंतु, इतक सगळं करून देखील वजन (Weight) वाढत राहते त्याचे नेमके कारण कोणते हे आपल्याला स्पष्ट होत नाही. सतत काम आणि त्याच्या होणाऱ्या त्रासामुळे देखील आपले वजन वाढू शकते. वजन वाढण्याचे नेमके कारण काय? किंवा ऑफिसमध्ये कोणत्या गोष्टी करू नये ज्यामुळे आपले वजन वाढते. या विषयी काही टिप्स आज देणार आहोत.

हे देखील पहा -

या गोष्टी ऑफिसमध्ये करु नका-

१. कामाच्या व्यापात आपले लक्ष खाण्याकडे कमी होत जाते त्यामुळे आपले वजन कमी होते. तसेच ऑफिस (Office) म्हटलं की, चारही बाजू बंद. त्यात कायम स्वरूपी चालू असणारी एसी. आपण कामात इतके व्यग्र असतो की, आपण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत नाही. त्यामुळे आपले वजन वाढू लागते.

२. कामाचा व्याप अधिक असला की, आपल्याला वेळेचे (Time) भान राहात नाही. काम करताना आपण अधिक उशिरापर्यंत जागे असतो त्यामुळे आपण उशिरा झोपतो. रात्रीच्या वेळी काम करताना आपल्याला जास्त भूक लागते. प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्याने आपले वजन वाढू लागते.

Don't do these things in office
उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पेय फायदेशीर ठरतील

३. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण काही गोष्टी बदलणे आवश्यक आहे. कामाच्या गडबडीत आपण अनेकदा जेवण वगळले तर आपले वजन अधिक प्रमाणात वाढू शकते.

४. कामात व्यस्त असताना आपण अशा काही पदार्थांचे सेवन करतो जे आपल्या शरीरासाठी चांगले नसते. जर आपण डाएट करत असू तर ते योग्यरित्या फॉलो करणे गरजेचे आहे. अवेळी किंवा जंक फूड खाल्ल्यानेही आपले वजन लगेच वाढते.

५. कधी कधी आपण कामात इतके व्यस्त असतो की, आपल्याला खाण्यासाठी पुरेसा वेळ नसतो अशावेळी आपण काम करताना पटापट खाल्ल्याने किंवा एकाच ठिकाणी अधिक वेळ बसल्याने देखील वजन वाढू शकते.

या गोष्टींची काळजी घेऊन आपण आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com