सावधान! व्हॉट्सअ‍ॅपवर चुकूनही करू नका या चुका, नाहीतर होऊ शकते अकाउंट बॅन Saam Tv
लाईफस्टाईल

सावधान! व्हॉट्सअ‍ॅपवर चुकूनही करू नका या चुका, नाहीतर होऊ शकते अकाउंट बॅन

व्हॉट्सअ‍ॅपने ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतात २० लाखापेक्षा अधिक अकाउंट बॅन करण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतात २० लाखापेक्षा अधिक अकाउंट (Account) बॅन करण्यात आले आहेत. या अगोदर अटी- नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ३०.२७ लाखहून जास्त भारतीय अकाउंट बॅन करण्यात आले होते. भारतात नवे IT नियम अनिवार्य करण्यात आले आहेत. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मासिक रिपोर्ट पब्लिश करतं, यात चुकीची माहिती, फेक न्यूज पसरवण्याबरोबरच अनेक कारणांसह या प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर रोखण्याकरिता कठोर पावले उचली जात आहेत.

हे देखील पहा-

व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेज एंड- टू- एंड एन्क्रिप्टेड असतात. परंतु, तरी देखील युजर्स काही शेअर करू शकत नाही, कारण व्हॉट्सअ‍ॅप अनेक मेटा डेटा ट्रॅक करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अधिकृत वेबसाइटवरती जर एखाद्या युजरने कंपनीच्या Terms of Service चे उल्लंघन केले, तर ते अकाउंट बॅन (Ban) करण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप नियम- अटींनुसार या गोष्टी केल्यामुळे तुमचे अकाउंट बॅन करण्याकरिता प्लॅटफॉर्मला ट्रिगर केले जाऊ शकते. त्याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप काही गुन्ह्यात पोलिसांना कारवाईकरिता युजरचा मेटा डेटाही देऊ शकणार आहेत.

1. जर तुम्ही एखाद्याचे फेक अकाउंट बनवले, तर व्हॉट्सअ‍ॅप तुमचे अकाउंट बॅन करू शकणार आहे.

2. जर एखादा व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल आणि त्या व्यक्तीला तुमच्याकडून अनेक मेसेज पाठवले जात असतील, तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन करण्यात येणार आहे.

3. जर युजर थर्ड पार्टी App व्हॉट्सअ‍ॅप Delta, GBWhatsApp, WhatsApp Plus चा वापर करत असेल, तरी देखील व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला बॅन करू शकणार आहे.

4. एखाद्याला अनेकांनी ब्लॉक केले असेल, तर व्हॉट्सअ‍ॅप कडून त्याला बॅन केले जाऊ शकणार आहे.

5. अनेकांनी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट विरोधामध्ये जर रिपोर्ट केले असेल, तर तुमच्यावर बॅन लागू शकणार आहे.

6. मालवेयर किंवा फिशिंग लिंक पाठवल्यावर व्हॉट्सअ‍ॅप कडून बॅन केले जाऊ शकणार आहे.- व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील क्लिप, धमकी मानहानी करणारे देखील मेसेज पाठवू नका.

7. व्हॉट्सअ‍ॅपवर हिंसेला प्रोत्साहन देणारे फेक मेसेज किंवा व्हिडीओ पाठवू नये.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawar Family: मोठी बातमी! पवार कुटुंब एकत्र येणार? आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Women Yoga Poses: हाडांच्या मजबुतीसाठी महिलांनी करा 'हे' 5 योगा, पन्नाशीनंतरही राहाल फिट

Maharashtra Live News Update: केडीएमसी महापौर पदासाठी रस्सीखेच

Shocking : नवऱ्याचा 'तो' शब्द जिव्हारी लागला, मॉडेलनं बेडरूममध्येच...; दरवाजा उघडताच समोर दिसलं भयंकर दृश्य

SCROLL FOR NEXT