Cancer Symptoms Saam Tv
लाईफस्टाईल

Cancer Symptoms: कॅन्सरच्या 'या' दोन लक्षणांकडे कधीच करू नका दुर्लक्ष, वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

World Cancer Day: कॅन्सरच्या बाबतीत सर्वात मोठी चिंता म्हणजे लोकांना त्याच्या लक्षणांची जाणीव नसते. कॅन्सरशी संबंधित माहिती असणे महत्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्करोगाच्या लक्षणांकडे लक्ष देऊन आणि वेळेवर उपचार घेतल्यास तो रोखता येतो.

Saam Tv

आजकाल, वाढतं शहरीकरण, बैठी आणि निष्क्रिय जीवनशैली तसेच वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. याशिवाय, प्रदूषणाच्या वाढत्या संपर्कामुळे ही चिंताजनक प्रवृत्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे. स्तनाचा कर्करोग हा सामान्यतः महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.

कॅन्सरच्या बाबतीत सर्वात मोठी चिंता म्हणजे लोकांना त्याच्या लक्षणांची जाणीव नसते. कॅन्सरशी संबंधित माहिती असणे महत्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्करोगाच्या लक्षणांकडे लक्ष देऊन आणि वेळेवर उपचार घेतल्यास तो रोखता येतो. अशा परिस्थितीत, तज्ज्ञांनी कर्करोगाच्या काही सामान्य लक्षणांबद्दल सांगितले आहे.

तज्ज्ञांचे मत काय आहे?

दिल्लीतील अॅक्शन कॅन्सर हॉस्पिटलचे मेडिकल ऑन्कोलॉची विभागाची संचालक आणि डॉ. जे. बी शर्मा म्हणाले की, हा आजार धोकादायक आणि जीवघेण आहे, परंतु वेळेत ओळखल्यास त्यावर उपचार करता येतात. लोकांना या आजाराबद्दल समजून घ्यावे लागेल. कॅन्सर हा एक असा आजार आहे. त्यामध्ये शरीराच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि इतर भागात पसरू लागतात. कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो.

कॅन्सरची लक्षणे

जर तुमचे वजन आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल न करता वेगाने कमी होत असेल तर हे कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे. ही कॅन्सरची दोन सामान्य वाटणारी लक्षणे आहेत. जी कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात. याशिवाय. पोटदुखी, स्तनातील गाठ किंवा सूज याकडेही दुर्लक्ष करू नये. असे तज्ञांनी सांगितले. त्याचसोबत तज्ज्ञ म्हणाले, आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित जीवनशैली, तंबाखूचे सेवन आणि हार्मोनल असंतुलन यामुळे लोकांना कर्करोग होण्याचा धोका आहे. म्हणून, कॅन्सरच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT