Nag Panchami 2023  Saam tv
लाईफस्टाईल

Nag Panchami 2023 : कुंडलीत आहे कालसर्पदोष? नागपंचमीच्या दिवशी या चुका करणे टाळा, अन्यथा होऊ शकतात वाईट परिणाम

कोमल दामुद्रे

Don't Do This Things On Nag Panchami :

श्रावण महिना सुरु झाला की, अनेक सण व्रत-वैकल्य सुरु होतात. या महिन्यात पहिला सण येतो तो नागपंचमी. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजे २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे.

प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला नाग देवताची पूजा केली जाते, परंतु, श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमी तिथीला नागपंचमी म्हणतात. या दिवशी नाग देवता किंवा नागाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस नाग देवाला समर्पित आहे. नागपूजा हा आपल्या संस्कृतीचा आणि पंरपरेचा भाग आहे.

कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीला (Nagpanchami) या ७ गोष्टी चुकूनही करु नका. ज्यामुळे तुमच्या ७ ही पिढ्यांना दोष लागू शकतो. जाणून घेऊया नागपंचमीचा शुभ मुहूर्त, नागांची पूजा करण्याचे महत्त्व आणि नियम.

1. नाग पंचमी 2023 पूजा मुहूर्त

  • नागपंचमीची तारीख 21 ऑगस्ट 2023, सोमवार 12:20 मिनिटांनी असेल,

  • नागपंचमीची तारीख 22 ऑगस्ट 2023, मंगळवारी दुपारी 2:00 वाजता संपेल.

  • नागपंचमी पूजा मुहूर्त - सकाळी 5:53 ते 8:30 पर्यंत

2. नागपंचमीला नागाची पूजा केल्याने काय फायदे होतात

ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला असेल तर त्याला मोक्ष मिळत नाही. अशावेळी नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील (Kundali) अनेक दोष दूर होतात.

ब्रह्मपुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी पूजेसाठी ब्रह्मदेवाने नागांना वरदान दिले होते. या दिवशी अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक आणि पिंगल नाग यांची पूजा करण्याचा विधी आहे. त्यांची पूजा केल्याने राहू-केतू जन्म दोष आणि कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळते.

3. या गोष्टी चुकूनही नागपंचमीच्या दिवशी करु नका

  • हिंदू धर्मात सापाला देवता मानले जाते. सापाला कधीही इजा होऊ नये, पण विशेषत: नागपंचमीच्या दिवशी सापांना (sneak) इजा करू नये. असे करून पिढ्यानपिढ्या येणाऱ्या सात जन्मांना दोष देतात.

  • या दिवशी कोणत्याही कामासाठी जमीन खोदू नये. असे केल्याने सापांचा बोळा किंवा बांबी माती किंवा जमिनीत तुटण्याची भीती असते. सापांना इजा झाली की कुटुंब उद्ध्वस्त होते, असे म्हणतात. मुलांना आनंद मिळत नाही.

  • या दिवशी जिवंत सापाला दूध देऊ नका. दूध हे सापांसाठी विषासारखे असू शकते, म्हणून त्यांच्या मूर्तीवरच दूध अर्पण करा.

  • नागपंचमीला चाकू, सुई यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करणे अशुभ मानले जाते. या दिवशी शिवणकाम, भरतकाम केले जात नाही.

  • नागपंचमीला लोखंडी पातेल्यात आणि तव्यात अन्न शिजवू नये. मान्यतेनुसार, भाकरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी वस्तू ही सापाची फणा मानली जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT