Don’t do these things for your mehendi  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

तुमची मेहंदी रंगते की, नाही... का नाही?

मेहंदी अधिक काळ टिकवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या लग्नसराई सुरु असल्यामुळे किंवा आपल्या घरात काही कार्यक्रम असल्यावर आपण हातावर मेहंदी काढतो. अनेकांना आपल्या हातावर मेहंदी लावायाला खूप आवडते. तर काहीवेळा मेहंदीशिवाय महिलांचा मेकअप पूर्ण होत नाही. बहुतांश वेळा मेहंदीचा रंग अधिक गडद करण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडत नाहीत. आपण अनेकदा मेहंदी लावताना काही सामान्य चुका करतो. त्यामुळे मेहंदीचा रंग चमकत नाही व ती लवकर निघून जाते. मेहंदीच्या डिझाईनपासून आपण तिची काळजी (Care) घेत असतो. पण कधीकधी मेहंदी लावताना अनवधानाने काही चुका झाल्यामुळे तुमच्या मेहंदीचा रंग फिका पडतो. त्यामुळे मेहंदी लावताना केलेली सगळी मेहनत वाहून जाते. अशावेळी, मेहंदी लावताना काही खास टिप्स (Tips) फॉलो करून तुम्ही मेहंदीला गडद आणि दीर्घकाळ टिकणारी बनवू शकता.

हे देखील पहा -

या चुका टाळून तुम्ही तुमच्या मेहंदीचा रंग अधिक गडद करु शकता.

१. लग्नासाठी किंवा कोणत्याही प्रसंगी मेहंदी लावताना ती एक किंवा दोन दिवसा आधी लावा. कारण मेहंदीला पूर्ण रंग येण्यासाठी किमान २४ ते ४८ तास लागतात. तसेच, हातावर मेंदी ५ ते ६ तासांपेक्षा जास्त ठेवू नका. असे केल्यास मेहंदी अधिक काळी होणार नाही.

२. बरेच लोक मेहंदी लावतात आणि ती तशीच सोडून देतात त्यामुळे मेहंदी सुकून ती पडते. त्यासाठी हाताला मेहंदी चिकटून राहण्यासाठी काही वेळ कापसाच्या मदतीने मेहंदीवर लिंबाचा रस आणि साखरेचे पाणी (Water) सतत लावत राहा. तसेच, मेहंदीचा रंग पूर्णपणे गडद करण्यासाठी हाताला लवंगाचा धूरही देऊ शकता.

३. मेहंदी सुकल्यानंतर ती हळूहळू काढून हात धुवा. मेहंदी काढल्यानंतर हातावर कोमट देशी तूप किंवा बाम लावल्यास मेहंदी बराच काळ टिकते. तसेच मेहंदी लावल्यानंतर त्या भागावर वॅक्सिंग करणे टाळा.

४. मेहंदी लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ धुवून त्यावर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. त्यामुळे मेहंदीतील रसायनांचा परिणाम आपल्या त्वचेवर होणार नाही. तसेच मेहंदी अधिक काळ हातावर टिकवण्यासाठी साबणाचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.

अशाप्रकारे तुम्ही मेहंदी अधिक काळ टिकवू शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: एमआयएमच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूर हादरलं!

Panvel Fort : पनवेलजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा, सह्याद्रीत लपलाय १८व्या शतकातील भव्य इतिहास

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये ढगफुटीचा तडाखा; धबधब्यावर आलेले पाच पर्यटक पुरात वाहून गेले, एकाचा मृत्यू

Gurupournima 2026 : गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? काय आहे महत्त्व?

CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एंट्री; 100% पेट्रोलसाठी सोशल मीडियावर मोहीम

SCROLL FOR NEXT