Does Helmet Cause Hair Loss saam tv
लाईफस्टाईल

Hair Loss: खरंच हेल्मेटच्या वापराने केसगळतीचा त्रास होतो? जाणून घ्या काय आहे सत्य

Does Helmet Cause Hair Loss: हेल्मेट वापरणं दुचाकी चालकांसाठी अनिवार्य आणि सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे आहे. पण अनेक लोक, विशेषतः तरुण, असा विचार करतात की हेल्मेट घातल्याने केस गळतात. त्यामुळे, ते हेल्मेट वापरणे टाळतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • हेल्मेटमुळे केस गळणं हे सरळ कारण नाही.

  • घट्ट हेल्मेटमुळे टाळूवर ताण येतो.

  • ओला स्कॅल्प केस गळण्यास कारणीभूत ठरतो.

स्कुटी किंवा बाईक चालवताना हेल्मेट घालणं गरजेचं आहे. मात्र अनेकांच्या मनात शंका असते की हेल्मेट किंवा टोपी वापरल्याने केस गळतात का? खास करून ज्या व्यक्ती नियमितपणे बाईक चालवतात किंवा उन्हापासून बचावासाठी टोपी घालतात, त्यांना ही भीती अधिक सतावते. खरंच हेल्मेटमुळे केस गळतात का? चला यामागचं खरं कारण जाणून घेऊया.

हेल्मेट आणि टोपी खरंच केस गळण्याचं कारण आहे का?

हेल्मेट किंवा टोपी घालणं हे थेट केस गळण्याचं कारण नसतं. मात्र, जर हे दीर्घकाळ चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं, तर त्यामुळे केसांना हानी पोहोचू शकते. विशेषतः खूप टाइट हेल्मेट किंवा टोपी वापरल्यास, हवेशीरपणा कमी होतो.

असं केल्याने डोक्याला आणि स्कॅल्पला घाम येतो. शिवाय ते डोक्याच्या त्वचेशी घासलं जातं आणि केसांच्या मुळांवर ताण येतो. यामुळे केस तुटणं किंवा गळणं याची शक्यता वाढते.

केस गळण्यामागचं खरं कारण

ज्यावेळी आपण घट्ट हेल्मेट किंवा टोपी वापरतो त्यावेळी टाळूला पुरेशी हवा मिळत नाही. त्यामुळे टाळूत घाम साचू लागतो आणि केसांच्या मुळांना हानी पोहोचते. सततची ओलसरपणा आणि उष्णता यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोंडा, खाज आणि केस गळणं अशा समस्या उद्भवतात.

स्वच्छता आणि योग्य आकार महत्त्वाचा

जर तुम्ही रोज किंवा दीर्घकाळासाठी हेल्मेट किंवा टोपी वापरत असाल तर त्याची स्वच्छता राखणं खूप आवश्यक आहे. वेळोवेळी त्यांना स्वच्छ धुवावं. त्याचप्रमाणे योग्य साइजची काळजी घ्यावी. फार टाइट हेल्मेट किंवा टोपी घातल्यास टाळूवर अतिरिक्त दाब येतो, ज्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो.

हेल्मेट घालणं केस गळण्याचे प्रत्यक्ष कारण आहे का?

नाही, पण चुकीच्या वापरामुळे केसांना हानी होऊ शकते.

टाइट हेल्मेटमुळे केसांवर काय परिणाम होतो?

टाळूवर दाब पडून केसांची मुळे कमजोर होतात.

हेल्मेटमुळे कोंडा का तयार होतो?

घामाच्या साचल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊन कोंडा होतो.

हेल्मेटची स्वच्छता का आवश्यक आहे?

संसर्ग टाळण्यासाठी आणि स्कॅल्पचे आरोग्य राखण्यासाठी.

केस गळण्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी?

योग्य साइजचे हेल्मेट वापरून ते नियमित स्वच्छ करावे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT