Surya Namaskar For Hip Fat  Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Namaskar For Hip Fat : सूर्यनमस्काराने शरिराच्या या भागाची चरबी कमी होऊ शकते? जाणून घ्या हा योग दिवसातून किती वेळा करावा

Surya Namaskar Benefits : योगा केल्याने आपले शरीर आणि मन निरोगी राहते. नियमितपणे योगाभ्यास केल्यास तुम्ही दीर्घकाळ निरोगी आयुष्याचा आनंद घेऊ शकता.

Shraddha Thik

Hip Fat Loss :

योगा केल्याने आपले शरीर आणि मन निरोगी राहते. नियमितपणे योगाभ्यास केल्यास तुम्ही दीर्घकाळ निरोगी आयुष्याचा आनंद घेऊ शकता. योगासन ही एक उत्कृष्ट शारीरिक क्रिया आहे, जी तुमची चयापचय सुधारते.

सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा क्रम आहे. याचा योग्य सराव केल्याने पोटावरील चरबी कमी होते. याचा नियमित सराव केल्यास मानसिक आरोग्यही (Health) मजबूत होऊ शकते. तसेच पचनक्रिया गतिमान होण्यास आणि शरीरातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. याशिवाय सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत. पण, सूर्यनमस्कार केल्याने हिप फॅट कमी होण्यास मदत होते का? याबद्दल जाणून घेऊयात.

सूर्यनमस्काराने हिप फॅट कमी करता येते का?

सूर्यनमस्कार (Surya Namaskar) हिप फॅट कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. खरं तर, जेव्हा आपण सूर्यनमस्काराने सुरुवात करतो, तेव्हा ते आपल्याला थोडे उबदार होण्यास आणि आपले स्नायू थोडे अधिक लवचिक बनविण्यात मदत करते. हे तुमच्या वरच्या मांड्या आणि हिपच्या स्नायूंना टोन करण्यास जास्त मदत करते. हा योगासन संपूर्ण शरीराला टोनिंग करण्यास मदत मिळते.

एका दिवसात किती वेळा सूर्यनमस्कार करावेत?

सूर्यनमस्कार दिवसातून 2 वेळा करावेत. कारण त्यात योगाचे 12 संच आहेत, ते दोनदा पूर्ण करणे म्हणजे 24 वेळा व्यायाम (Workout) करणे. सुरुवातीला, 20 मिनिटे व्यायाम करा. तुमच्या फिटनेसनुसार सूर्यनमस्काराच्या 5 ते 10 वेळा पूर्ण सुर्यनमस्कार घाला. हे नियमितपणे केल्याने तुमच्या शरीरातील सगळी चरबी कमी होण्यास मदत होते.

याशिवाय तुम्ही नियमितपणे सूर्यनमस्कार योगासने वेळोवेळी करायला सुरुवात करावी. यामुळे हिप फॅट तर कमी होईलच पण शरीरातील उरलेली फॅट कमी होऊन कॅलरी बर्न करून टोनिंग होण्यास मदत मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Maharashtra Live News Update: खडकवासला धरणामधून 28 हजार पाण्याचा विसर्ग

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT