White Hair Fact  Saam tv
लाईफस्टाईल

White Hair Fact : पांढरे केस उपटून काढल्याने सगळे केस पांढरे होतात का? जाणून घ्या यामागचे तथ्य

Does Plucking White Hair Lead To More Greying : अनेकांना पांढरे केस तोडण्याची घाण सवय असते. एक पांढरा केस तोडल्याने इतर केसही पांढरे होतात का? यामागे किती तथ्य आहे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Premature White Hair Plucking :

हल्ली केसगळतीच्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. कोणत्याही ऋतूमध्ये केसगळतीची समस्या ही कायम असते. केसगळती, केस कमकुवत होणे आणि पांढऱ्या केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

परंतु, अनेकदा केसगळतीच्या समस्येपेक्षा केस पांढरे होण्याच्या समस्यांमुळे वैतागले आहेत. वयोमानानुसार केस पांढरे होऊ लागतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे लहान वयात केस पांढरे होऊ लागले आहेत.

डोक्यावर पांढरे केस (Hair) दिसू लागले की, आपण त्यांना डाय किंवा मेहंदी लावण्याचा प्रयत्न करतो. पण तरी देखील महिन्याभरानंतर केस पुन्हा पांढरे होऊ लागतात. अशातच अनेकांना पांढरे केस तोडण्याची घाण सवय असते. एक पांढरा केस तोडल्याने इतर केसही पांढरे होतात का? यामागे किती तथ्य आहे जाणून घेऊया.

1. केस पांढरे का होतात?

हेअर फॉलिकल्स आपल्या टाळूमध्ये असल्यामुळे केसांची वाढ होते. मेलेनोसाइट्स केसांच्या कूपभोवती आढळतात. जे मेलेनिन तयार करतात. मेलेनिनचे उत्पादन कमी झाल्याने केसांना नैसर्गिक रंग मिळत नाही. त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. बरेचदा यामध्ये पोषक तत्वांची देखील कमतरता असते. जस जसे वय वाढते, ताणतणाव (Stress), खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आनुवंशिकता यांचा देखील दुष्परिणाम असतो.

2. पांढरे केस तोडू नये का?

तज्ज्ञांच्या मते, एक पांढरा केस तोडल्याने इतर केस पांढरे होत नाही. केसांचा रंग हा रासायनिक मेलेनिनपासून येतो. ते कमी-जास्त झाले की, केसांचा रंग बदलतो. केस गळाल्याने मेलेनिनमध्ये काही फरक पडत नाही. पांढरे केस तोडले किंवा कापले तरी तिथे पुन्हा नवीन केस येतात.

सतत केस पिकत किंवा गळत असतील तर आहारात (Food) पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा वापर करा. तसेच केसांची योग्य प्रकारे काळजी घ्या. तणाव आणि चिंता कमी प्रमाणात करा. केसांवर रासायनिक प्रक्रियांचा वापर कमी करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT