Over Exercise Side Effects
Over Exercise Side Effects  Saam Tv
लाईफस्टाईल

Over Exercise Side Effects : जास्त एक्सरसाइज केल्याने हृदय निरोगी राहाते का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत !

कोमल दामुद्रे

Over Exercise Side Effects : आरोग्याला फायदा होण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे असते यात काही शंकाच नाही. पण काही लोकांचे असे म्हणणे आहे की जास्त व्यायाम केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. पण ते कितपत योग्य आहे? जास्त व्यायाम केल्याने खरच हृदय निरोगी राहते का? अनेक लोकांच्या मनात व्यायामाबाबत गैरसमज आहेत.

लोकांचा असा विश्वास आहे की, जास्त व्यायाम केल्याने शरीराला फायदा होतो परंतु त्यांना हे माहित नाही की यामुळे बऱ्याच वेळा गंभीर आजारांच्या (Disease) समस्यांना सामोरे जावे लागेल. मार्च 2020 वर्षातील सर्क्युलेशन या मासिकेतील एका निवेदनात अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एक्सपर्टने असे सांगितले की, शरीरासाठी (Health) मर्यादित प्रमाणात केलेल्या व्यायाम फायदेशीर असतो.

जर तुम्ही जास्त प्रमाणात व्यायाम केला तर त्याचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. आणखीन एका इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार व्यायाम केल्याने कमीत कमी 40 हेल्थ कंडिशनपासून बचाव करण्यास मदत मिळते, ज्या फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे बिघडलेले असते. यामध्ये लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, डिप्रेशन, टेन्शन,डायबिटीज (Diabetes), कोलणं आणि इतर कर्करोग यांचा समावेश असतो.

1. व्यायाम केल्याने आयुर्मान वाढते का?

एका अहवालानुसार असे समोर आले आहे की,जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांच्या तुलनेत व्यायाम करणाऱ्यांचे आयुर्मान सात ते आठ वर्ष जास्त असते. व्यायाम करण्याचे इतके फायदे असूनही, व्यायाम नेहमीच फायदेशीर ठरेल असे नाही. अलीकडच्या काळात जिम मध्ये जाऊन फिट राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. त्या घटनांनी लोकांना विचार करण्यास भाग पाडले आहे,ते म्हणजे जे लोक फिट आहेत आणि जिम करत आहेत त्यांना देखील हृदयाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो का?

2. व्यायाम केल्याने हृदयाच्या समस्या दूर होतात का?

हृदयाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी व्यायाम फायदेशीर असू शकतो, परंतु व्यायाम केल्याने तुमचे हृदय निरोगी राहील किंवा तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणताही आजार होणार नाही हे ठामपणे सांगणे अवघडच आहे. असे काही व्यायाम आहेत जे हृदयाची गती वाढवणारे आहेत.त्यात जलद चालणे, पोहोणे, सायकल चालवणे,जॉगिंग, डान्स करणे यांचा समावेश असतो. यांना एरोबिक्स असे म्हणतात सर्व प्रौढ व्यक्तींनी हा व्यायाम केला पाहिजे.

एरोबिक्स केल्यामुळे शरीराचे वजन कमी होते तसेच रक्तवाहिन्यांना आराम मिळते आणि रक्तदाब कमी करण्यास मदत होते.यासोबतच कॅलरी बर्न करण्यास, ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करणे, फॅट कमी करण्यासाठी एरोबिक्स फायद्याचे आहे. कार्डिया केल्याने केल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आरोग्याच्या संबंधित अनेक धोके कमी करण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval Constituency : मावळ मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षांचा भंग, वर्षानुवर्ष सागरी पूल राहिला कागदावरच

Online Payment: 'या' टीप्स वापरा करा तुमचे UPI खातं सुरक्षित

Beed Crime: बीडमध्ये तब्बल २ कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू; पुण्यातील भाजप नेत्याला फोनवरून धमकी

Rohit Pawar: व्वा दादा व्वा! गुंडच तुमचा खुलेआम प्रचार करतायेत; आमदार रोहित पवारांची खळबळजनक पोस्ट

SCROLL FOR NEXT