Manasvi Choudhary
ऑफिसमध्ये केवळ कामच नाही तर अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.
अनेक मेहनती लोक ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये सापडतात आणि संकटात येतात.
मात्र तुमच्यातली हुशारी योग्य वेळी अवलंबली तर तुम्ही ही परिस्थिती सहज हाताळू शकतात.
ऑफिस पॉलिटिक्सचा सामना करण्यासाठी मदत करणारे मार्ग जाणून घ्या.
सर्वप्रथम कोणत्याही प्रकारच्या ऑफिसच्या राजकरणात अडकू नये.
लहान- मोठ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करा.
तुमच्यातील संयमाची भावना अत्ंयत महत्वाची आहे. काही व्यक्ती तुम्हाला रागावण्याचा व अपमानित करण्याचा प्रयत्न करेन अशावेळी तुम्ही योग्य निर्णय घ्या.
राजकारण टाळण्यासाठी चांगले संबंध निर्माण करा. सर्वाशी मैत्री करणे आवश्यक नाही मात्र नाते सहकार्याची भावना मनात ठेवा.
ऑफिसमधील गॉसिप आणि अफवांपासून दूर राहा अशावेळी तुमच्या कामाकडे लक्ष द्या.