Manasvi Choudhary
अभिनेत्री हृता दुर्गुळे ही प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाह याची पत्नी आहे.
हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह या दोघांची ओळख सासुबाई मुग्धा शाह यांच्यामुळे झाली.
मुग्धा शाह या प्रतीकच्या आई आहेत.
मुग्धा आणि हृताने दुर्वा मालिकेत एकत्र काम केले होते. मुग्धा शाह हृताच्या सासुच्या भूमिकेत होत्या. यावेळी सेटवर त्यांनी हृताला प्रतीकशी ओळख करून दिली.
यानंतर हृता आणि प्रतीकची ओळख झाली. पुढे त्याची मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले.
हृताने दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत १८ मे २०२२ मध्ये लग्न केले आहे.