5 Streching Exercise : सकाळी 'या' 5 स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा, दिवसभर फ्रेश राहा !

Daily Exercise : ऑफिसमध्ये एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे पाठीत जडपणा येतो.
Physical Fitness
Physical Fitness Saam Tv

Morning Exercise : रोजच्या धावपळीच्या जीवनात एक्सरसाइज करायला अजिबात वेळ मिळत नाही तसेच ऑफिसमध्ये एका ठिकाणी बसून काम केल्यामुळे पाठीत जडपणा येतो त्याचा परिणाम पाठीवर होऊन पाठदुखीच्या समस्या निर्माण होतात.

जास्ती हालचाल होत नसल्यामुळे वजन वाढणे आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत शरीर थोडे जरी ताणले तरी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी (Health) ही लाभदायक ठरते.

Physical Fitness
Daily Routine : हेल्दी लाँग लाईफ हवी असेल तर फॉलो करा 'या' टिप्स, माईंड आणि स्वभाव राहील शांत !

चला तर मग बघूया फिटनेस (Fitness) तज्ज्ञ रूजुता दिवेकर त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सुचवलेले पाच स्ट्रेचिंग एक्सरसाइजच्या कधीही केले जाऊ शकतात.

1. मांडयासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज

सर्वात आधी एका ठिकाणी उभे रहा. हाताने पाय धरून गुडघ्यात वाका. आता आपला पाय वाकवा आणि नितंबावर घ्या पाच पर्यंत मोजा आता दुसऱ्या पायासाठी ही पुन्हा अशीच प्रक्रिया करा. मांडीच्या मागच्या बाजूला असलेल्या स्नायूंना हॅमस्ट्रिंग म्हणतात.जर तुम्हालाही पाठदुखी सारख्या समस्या आणि थकवा जाणवत असेल. तर ही एक्सरसाइज तुम्ही नक्की केली पाहिजे आपले, तळवे भिंतीवर ठेवा भिंतीकडे झुकलेल्या शरीराला धक्का द्या आपली नितंब मागे ढकल पाठ सरळ ठेवा पाच मोजेपर्यंत या स्थितीत राहा.

2. बॉडी पार्ट स्ट्रेचिंग एक्सरसाइज

ही एक्सरसाइज खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता त्यासाठी सर्वप्रथम खुर्चीवर बसा शरीर थोडे पुढे सरकवा हात सरळ ठेवताना अंगठ्याला स्पर्श करण्यास चा प्रयत्न करा जर तुम्हाला स्पर्श करता येत नसेल तर तुम्ही जेवढे स्पर्श करू शकता तितकेच करा हे करत असताना शरीर सरळ ठेवा.

Body Streching
Body StrechingCanva

3. अप्पर बॉडी स्ट्रेचिंग व्यायाम

यासाठी सरळ उभे रहा दोन्ही हात एकमेकांच्या विरुद्ध बाजूने फिरवून नमस्काराच्या मुद्रेत हात करण्याचा प्रयत्न करा असे होत नसल्यास हळूहळू करण्याचा प्रयत्न करा ते योग्य प्रमाणे कसे करायचे हे शिकण्यासाठी तीन महिने लागू शकतात.

4. वरचा हात ताणण्याचा व्यायाम

हा व्यायाम करण्यासाठी आपल्या हात वर करा आणि वळवा आता हात मागे घ्या दुसऱ्या हाताच्या तळवणे कोपर दाबा आणि एक ते पाच मोजणी होईपर्यंत हे करा.दुसरीकडे त्याच प्रक्रियेचे पुनरावृत्ती करा हे दररोज केल्याने बारा आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल.

5. पायांनी हात ताणणे

प्रथम सरळ उभे राहा आणि आपले पाय पसरवून दोन्ही हात पुढे बांधा आणि या स्थितीत खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करा एक ते पाच पर्यंत मोजल्यानंतर शरीर रिलॅक्स करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com