Urvashi Rautela : उर्वशीच्या चाहत्यांचा स्वॅग लय भारी, अभिनेत्रीचा दुबईत झाला सन्मान

Urvashi Rautela Honoured With Award In Dubai : उर्वशी रौतेलाला GAMA पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Urvashi Rautela Honoured With Award In Dubai
Urvashi RautelaSAAM TV
Published On
Summary

उर्वशी रौतेलाला “Fans Favourite Star Actress Award” ने गौरवण्यात आले आहे.

GAMA पुरस्कार सोहळा दुबईत पार पडला आहे.

उर्वशी रौतेलाचे जगभरात मोठा चाहता वर्ग आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने आजवर अनेक सुपरहिट गाणी केली आहेत. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिच्या लूकचे व्हिडीओ आणि फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्वशी रौतेलाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

उर्वशी रौतेला दुबईत “FANS FAVOURITE STAR ACTRESS AWARD” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. यासंबंधित एक खास पोस्ट उर्वशीने सोशल मीडियावर केली आहे. उर्वशी रौतेलाने पुरस्कार घेताना खूपच सुंदर शिमरी ग्रीन कलरचा गाउन परिधान केला होता. मोकळे केस, हाय हिल्स आणि ग्लॉसी मेकअपमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. उर्वशी रौतेने पोस्टला खूप खास कॅप्शन दिले आहे.

उर्वशी रौतेला पोस्ट

“Fans Favourite Star Actress Award मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार तुम्हा सर्वांचा आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात.बरेच लोक मला विचारतात की, मी कधीही कोणाविरुद्ध का बोलत नाही कारण माझ्याकडे मधील तुमच्यासारखे स्ट्राँग, प्रेमळ, निष्ठावंत, प्रामाणिक चाहते आहेत. तुमचा पाठिंबा, आणि तुमचे प्रेम नेहमीच माझ्यासोबत असते.हा पुरस्कार आपल्या नात्याचा पुरावा आहे. मला तुमची आवडती स्टार बनवल्याबद्दल धन्यवाद!”

उर्वशी रौतेलाने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. तसेच कलाकारमंडळी देखील तिला शुभेच्छा देत आहे. उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर 70.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रीचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. GAMA पुरस्कार सोहळा दुबईत पार पडला आहे. उर्वशी रौतेला अलिकडेच 'डाकू महाराज' या सिनेमात दिसली होती. चाहते आता तिच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Urvashi Rautela Honoured With Award In Dubai
Karisma Kapoor : "करिश्मा कपूरला ३०००० कोटींमधील एक रूपयाही नकोय, पण..." ; अभिनेत्रीच्या वकिलाचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com