Microwave Oven Health effect saam tv
लाईफस्टाईल

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने कॅन्सर होतो? डॉक्टरांनी दिलं तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर!

Microwave Oven Health effect: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात क असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या खाणं गरम करायचं म्हटलं की, आपण थेट डबा किंवा भांडं मायक्रोव्हेवमध्ये सरकवतो. अवघ्या १ ते २ मिनिटांमध्ये आपण फ्रीजमधून नुकतंच बाहेर काढलेलं अन्न गरमागरम होऊन आपल्या समोर येतं. मात्र हे तुमच्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे?

ऑफिस असो, रेस्टॉरंट असो, हॉटेल असो किंवा घरातील स्वयंपाकघर, मायक्रोवेव्हचा वापर जवळपास सगळ्याठिकाणी होतो.

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात क असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. कदाचित तुमच्याही मनात हा प्रश्न असेल. तर आज या प्रश्नाचं उत्तर आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणं हानिकारक?

मायक्रोवेव्हच्या वापराबाबत सातत्याने असं सांगितलं जात आहे की, त्यात गरम केलेले अन्न खाल्ल्याने कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. पण यावर तज्ज्ञांचं काय मत आहे ते जाणून घेऊया.

डॉक्टरांचं म्हणणं काय?

मुंबईतील डॉ. नितीश नाडकर्णी यांनी सांगितलं की, मायक्रोव्हेवमध्ये अन्न गरम केल्यानंतर ते खालल्यामुळे कॅन्सर होत नाही. त्यामुळे हा एक चुकीचा समज आहे. मायक्रोव्हेवमध्ये अन्न गरम करण्यासाठी त्यामध्ये Non -Ionizing रेडिएशनचा वापर होता. रेडिएशन हे दोन पद्धतींचे असतात. यामध्ये एक रेडिएशन ionizing हे असतं तर दुसरं non-ionizing आहे. क्ष-किराणा सारख्या गोष्टी Ionizing रेडिएशन हे वापरण्यात येत असून यामध्ये मानवी डीएनए डॅमेज होण्याचा धोका असतो. तर non-ionizing तुमच्या शरीराला कोणताही त्रास होत नाही.

मायक्रोव्हेवमध्ये non-ionizing रेडिएशनचा वापर केला जातो. त्यामुळे यामध्ये गरम केलेलं अन्न खाण्याचा आणि कॅन्सरचा संबंध नाही, असंही डॉ. नितीश म्हणालेत.

मायक्रोवेव्हमध्ये कोणतं भांडं वापरता हे महत्त्वाचं

डॉ. नाडकर्णी यांच्या सांगण्यानुसार, मात्र मायक्रोव्हेवमध्ये अन्न गरम करताना आपण ते कोणत्या भांड्यात गरम करतोय हे देखील महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे प्लॅस्टिकच्या भांड्यात अन्न गरम केल्याने त्यातील केमिकल्स उष्णतेमुळे अन्नात मिसळतात आणि ते तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. या केमिकल्समुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका असू शकतो. त्यामुळे मायक्रोव्हेवमध्ये खाणं गरम करताना काचेच्या भांड्यात केलं पाहिजे. जे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

SCROLL FOR NEXT