green tea weight loss google
लाईफस्टाईल

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Weight Loss Truth: ग्रीन टी वजन कमी करते का? तज्ज्ञांच्या मते ग्रीन टी चयापचय सुधारते, पण योग्य डाएट आणि व्यायामाशिवाय वजन कमी होत नाही.

Sakshi Sunil Jadhav

वाढतं वजन आणि लठ्ठपणामुळे त्रासलेले लोक वजन कमी करण्यासाठी सोपे उपाय शोधतच असतात. यावर लोकांना ग्रीन टी हा उपाय सगळ्यात सोपा आणि कमी खर्चीक वाटतो. त्यामुळे लोक डाएट न करता, व्यायाम न करता आणि जीवनशैलीत कोणतेच बदल न करता फक्त ग्रीन टीवरच अवलंबून राहतात. पण यामागचं सत्य काय आहे? खरंच ग्रीन टी तुमचं वजन कमी करते का? हे जाणून घेण्यासाठी पुढील संपूर्ण बातमी वाचाच.

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ग्रीन टीला औषधी गुणधर्म असल्याचं तज्ञ सांगतात. हजारो वर्षांपासून ग्रीन टीचा उपयोग पचन सुधारण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी करतात. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि कॅफिन ही पोषक द्रव्ये (Nutrients)असतात. ही द्रव्ये शरीराचा मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शरीरातली ऊर्जेची पातळी वाढते आणि कॅलरी बर्न होतात.

नोएडा येथील डायटेटिक्स कन्सल्टंट वंदना राजपूत यांच्या मते, फक्त ग्रीन टीचे सेवन केल्याने वजन कमी होत नाही. ग्रीन टीमध्ये कोणताही जादूई घटक नाही. ज्याने शरीरातली चरबी लगेचच कमी होईल.

ग्रीन टी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला फक्त मदत करू शकते. पण त्यासाठी वेळ लागतो. त्याचा परिणाम लगेच २ ते ४ दिवसात दिसून येत नाही. रोजच्या रोज व्यायाम आणि योग्य आहारासोबतच ग्रीन टीचा समावेश केल्यावर वजन कमी होतं.

ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीरातला चयापचय सुधारतो. त्यामुळे फॅट लवकर कमी होतो. विशेषतः पोट, मांड्या आणि शरीराच्या इतर भागात साठलेली चरबी कमी होते. पण, ही प्रक्रिया रोजच्या रोज व्यायाम करणाऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरते.

याशिवाय ग्रीन टी भूक नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. ग्रीन टीचे सेवन केल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे वारंवार खाणं किंवा नको असलेला फॅटी स्नॅक्स टाळता येतो. याने वजन नियंत्रित करता येतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदान जागृतीसाठी पीएमपीएमएल कडून अनोखे गीत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Nail Art : ब्यूटी पार्लरसारखे नेल आर्ट करा आता घरच्या घरी, पाहा डिझाइन

Contrast Saree Blouse : साडीसोबत घाला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज; सणासुदीला मिळेल परफेक्ट लूक, सगळेच म्हणतील WOW

Maharashtra Tourism: नेपाळसारखा View महाराष्ट्रात पाहायचाय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्याच

SCROLL FOR NEXT