Sakshi Sunil Jadhav
काही व्यक्तींना ठरावीक पदार्थ खाल्यावर खूप जास्त Acidityचा त्रास होतो. म्हणून लोक ते खाणं टाळतात.
काही वेळेस लोकांना दुपारच्या जेवणानंतरही Acidityचा त्रास व्हायला लागतो. त्याने सतत ढेकर येतात आणि पोटात गॅस होतो.
तुम्हाला माहितीये का? की Acidity किंवा गॅस होण्याचं कारण तुमचा आहार किंवा डाएट असू शकतं. पुढे आपण कोणत्या पदार्थांनी जास्त Acidity होऊ शकते हे जाणून घेणार आहोत.
कोणतेही मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्याने तुमच्या पोटात गॅस जमा होतो. काहींना याचा त्रास कमी प्रमाणात होतो तर काहींना जास्त प्रमाणात.
काहींना वांगी, काकडी, कोबी, सोयाबीन, हिरवे वाटाणे आणि मुळा या भाज्या खाल्याने Acidity होते.
ज्या व्यक्तींना गॅस किंवा Acidityचा त्रास आहे त्यांनी बिअर आणि अल्कोहोल टाळा.
ज्या व्यक्तींना Acidity सतत त्रास होतो त्यांनी राजमा, हरभरे, चणे या डाळी टाळाव्यात.
गॅसचा त्रास असलेल्या लोकांसाठी कोल्ड्रिंक्स, कॅफिन आणि रिफाइंड पीठ वापरू नये. त्याने पचनक्रियेत बदल होतात. जर तुम्हाला Acidity असेल तर दूध, दही आणि चीज खाऊ शकता.