Can Diabetics Eat Salt Saam Tv
लाईफस्टाईल

Can Diabetics Eat Salt : मीठ खाल्याने खरच मधुमेह होतो का? रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

Diabetes Causes : मधुमेह हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या तीव्र आजारांपैकी एक आहे.

Shraddha Thik

Diabetes Symptoms :

मधुमेह हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या तीव्र आजारांपैकी एक आहे. याच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेहाच्या रुग्णांना साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकते आणि त्यांची समस्या (Problem) गंभीर होऊ शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केवळ साखरच (Sugar) नाही तर मीठ खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. अमेरिकेच्या टुलेन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले की, जेवण करताना मीठ घेतल्याने मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढतो. जाणून घेऊया नवीन अभ्यास काय म्हणतो.

नवीन अभ्यास काय आहे

जर्नल मेयो क्लिनिक प्रोसीडिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात 400,000 हून अधिक प्रौढांच्या दैनंदिन खाण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. या सर्वांच्या मीठ खाण्याच्या पद्धतींचाही अभ्यास करण्यात आला. सरासरी 11.8 वर्षांच्या फॉलोअपमध्ये, टाइप 2 मधुमेहाची प्रकरणे सुमारे 13 हजार लोकांमध्ये आढळली आहेत. कमी मीठ खाणाऱ्यांच्या तुलनेत, नेहमी मीठ खाणाऱ्यांमध्ये टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका 39 टक्के जास्त असल्याचे दिसून आले.

मीठ खाल्ल्याने या आजारांचा धोका असतो

टुलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्रोफेसर आणि प्रमुख लेखक डॉ. लू क्यूई म्हणाले, 'आम्हा सर्वांना माहित आहे की जास्त मीठ सेवन हानिकारक आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते. या नवीन अभ्यासानुसार, जास्त मीठ खाल्ल्याने केवळ मधुमेहच नाही तर इतर अनेक आरोग्याशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.

जास्त मीठ खाल्ल्याने होणारे आजार

1. लठ्ठपणा

2. शरीरात सूज येणे

3. हाडांमध्ये कमकुवतपणा

4. पाणी धारणा

5. उच्च बॉडी मास इंडेक्स

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT