Rice And Diabetes  google
लाईफस्टाईल

Rice And Diabetes: भात खाल्ल्यानं खरंच डायबेटिस होतो? २ अक्षरांचं उत्तर अन् मनातली शंका होईल काही मिनिटांत दूर

Blood Sugar Control: भात खाल्ल्याने डायबेटिस होतो का, हा गैरसमज डॉक्टर स्पष्ट करतात. इन्सुलिन रेझिस्टन्स, आहारशैली आणि जीवनशैली यांचा साखरेवर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

भारतामध्ये मोठ्या संख्येने भात खाल्ला जातो. काहींना भाताशिवाय जेवण केलंय असं वाटत नाही. मात्र काही ठरावीक वेळेनंतर किंवा काही आजारांमुळे भात टाळावा लागतो. त्यात डायबिटीजच्या रुग्णांनी भात खाणं वेळीच टाळणं खूप गरजेचं आहे. असं प्रत्येक रुग्णाला वाटतं. पण खरोखरचं भात खाल्याने डायबिटीज वाढतो का? हा प्रश्न अनेकांच्या मनात भिती निर्माण करत असतो. ही समस्या कितीही सामान्य वाटत असली तरी तुमच्या शरीरासाठी खूप महत्वाची मानली जाते.

रेडायल क्लिनिकचे संस्थापक आणि डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा व PCOSचे तज्ज्ञ असलेले डॉ. गगनदीप सिंग सांगतात की, डायबिटीजचं मूळ कारण भात नसून इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. एकाच प्रमाणात भात खाणारे काही लोक पूर्णपणे निरोगी राहतात, तर काहींना डायबिटीज होतो. यामागे फक्त खाणं नाही, तर व्यक्तीची एकूण मेटाबॉलिक तब्येत कारणीभूत असते.

डॉक्टरांच्या मते भारतीयांमध्ये अनुवांशिकदृष्ट्या डायबिटीजचा धोका इतर देशांच्या तुलनेत तीन ते चार पटीने जास्त आहे. बैठी जीवनशैली, पोटावरील फॅट, कमी झोप, सततचा ताणतणाव आणि प्रथिनांचं कमी प्रमाण असलेला आहार यामुळेच इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. अशात भात खाल्ला तर साखर जास्त वाढू शकतं, पण तो डायबिटीज वाढवत नाही.

भात खाल्ल्यानंतर साखर किती वाढेल हे त्या व्यक्तीच्या तब्येतीवर अवलंबून असतं. काही रुग्णांमध्ये 30 ते 60 मिनिटांत साखर 140 ते 180 पर्यंत जातं, तर निरोगी व्यक्तींमध्ये ती 120 ते 140 दरम्यानच राहतं. विशेष म्हणजे भातासोबत डाळ, भाज्या, आणि थोडे फॅटी फूड्स घेतल्यावर हा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी होतो. शिजवलेला भात थंड करून पुन्हा गरम केल्यावर त्यातला रेझिस्टंट स्टार्च वाढतो.

फक्त ब्राऊन राइस खाल्ल्यानं डायबिटिज आटोक्यात येईल, हा सुद्धा एक गैरसमज असल्याचं तज्ज्ञ सांगतात. ब्राऊन राइसमुळे साखरेचं प्रमाण थोडं कमी होतं, पण व्यायाम, झोप आणि एकूण आहारशैली सुधारली नाही तर फरक पडत नाही. भात पूर्णपणे खाणं सोडू नका, पण प्रमाणात खा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio New Recharge Plan: Jio ग्राहकांसाठी खुशखबर; डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा फक्त 75 रुपयांत

मतदानाआधीच राजकीय भूकंप! बड्या नेत्याने शरद पवारांची सोडली साथ; ४२ वर्षांची निष्ठा संपुष्टात

Milk Dishes : घरच्या घरी दुधापासून बनणाऱ्या ५ स्वादिष्ट डिश, एकदा करुन बघा

Maharashtra Live News Update: महापालिकेच्या बीओटी तत्वावर सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणची सरंक्षक भिंत कोसळली

Pune : शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारावर जीवघेणा हल्ला; धारदार कोयत्याने वार,पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT