Child Care Tips
Child Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Child Care Tips : तुमचे मुलंही झोपेत अंथरुण ओले करते ? मग 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

कोमल दामुद्रे

Bed Wetting In Children : अनेकदा मुले गाढ झोपेत असतात त्यामुळे अंथरूणात लघवी होते पण ही समस्या तीन वर्षांवरील मुलांमध्ये असेल तर ती दूर करणे गरजेचे असते. मुले जसजशी मोठे होत जातात तसे अंथरूण ओले करणायची सवय लागते. त्यामुळे त्यांची ही सवय वेळीच मोडण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

मुलांनी रात्री अंथरूण ओले करण्याचे अनेक कारणे असू शकतात. युरेन इन्फेक्शन, जुनाट आजार, बद्धकोष्टता, जास्ती गोड पदार्थ खाणे, संध्याकाळच्या वेळी जास्त पाणी पिणे, खूप गाढ झोपेत असणे. या काही कारणांमुळे मुलांना अंथरूणात लघवी करण्याची सवय लागते. त्यासाठी काय करायला हवे हे जाणून घ्या

1. संध्याकाळी पातळ पदार्थ देऊ नका

मुलांना (Kids) कमी प्रमाणात कोल्ड्रिंक,चहा ,कॉफी दिले पाहिजे. जरी दिवसभर भरपूर पाणी पिले तरी काही हरकत नाही. परंतु रात्री झोपण्याआधी त्यांना जास्त पाणी देऊ नका तसेच चहा आणि कोल्ड्रिंक्स देखील देणे टाळा. हे मुलांना झोपण्यापूर्वी मूत्राशय रिकामे करण्यास मदत करत त्यामुळे मूत्राशयात मूत्र जमा होऊ शकत नाही.

2. दालचिनी खाऊ घाला

जर तुमचे मूल रात्री अंथरून ओले करत असेल तर त्यांना दालचिनीचे सेवन करायला सांगा. जर मूल मोठे असेल तर दिवसभरातून कधीही त्यांना दालचिनी चघळायला द्या. जर तुमचे मुलं चार ते पाच वर्षाचे असेल तर त्यांना दालचिनी पावडर बनवून त्यात थोडे मध टाकून त्यापासून पेस्ट तयार करून सेवन करायला द्या.

Child Care Tips

3. आवळा खायला द्या

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी मुबलक प्रमाणात असते. त्यापासून पावडर तयार करून मुलांना द्या. तुम्हीच केलेला आवळा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात (Water) मिक्स करून मुलांना द्या. यामुळे तुम्हाला फरक जाणवेल.

4. ऑइल मसाज

ऑइल मसाज करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता ऑलिव्ह ऑइल मध्ये ओमेगा-थ्री, ऍसिडिटी आणि व्हिटॅमिन ए आढळते. ऑलिव्ह ऑइल कोमट करून मुलाच्या खालच्या ओटीपोटावर तेलाने मालिश करा रोज रात्री झोपण्यापूर्वी तेलाने हलके मसाज केल्यास तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.

5. या काही गोष्टी लक्षात ठेवा

बऱ्याच वेळा भीतीमुळे अंथरून ओले करू शकते बाथरूम जवळील लाईट रात्री चालू ठेवा. त्यामुळे मुलांना भीती वाटणार नाही.रात्रीला मुलांना पाणी पियायला देऊ नका. दररोजचे लघवी करण्यासाठी उठवण्याचा नियम तयार करा.मुलांना हॉट चॉकलेट (Chocolate) देणे टाळा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले दीड कोटी

Shekhar Suman : शेखर सुमन यांचा भाजप प्रवेश; कंगना रणौतचा प्रचार करणार का?

Loksabha Election: उत्सव लोकशाहीचा! सेलिब्रिटी ते राजकीय मंडळी; 'या' दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्का; PHOTO

Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT