Liver disease saam tv
लाईफस्टाईल

Liver disease: त्वचेवर दिसतायत का हे 5 बदल? लिव्हर निकामी होण्यापूर्वी शरीर देतंय गंभीर इशारे, वेळीच जाणून घ्या

Skin symptoms: लिव्हरचे आजार सुरुवातीला शांतपणे वाढू शकतात. त्वचा आणि डोळे पिवळे होणे, सतत खाज, लालसर तळहात, स्पायडर अँजिओमा आणि गडद डाग यांसारखी लक्षणे गंभीर लिव्हर समस्यांचा इशारा असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हरच्या आजारांची कोणतीही लक्षणं सुरुवातीच्या काळात दिसून येत नाहीत. मात्र शरीर आपल्याला काही संकेत देत असतं आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचे संकेत त्वचेवर दिसू शकतात. हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डमध्ये प्रशिक्षण घेतलेले लिव्हरचे तज्ज्ञ डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, त्वचेमध्ये होणारे काही बदल हे लिव्हर नीट काम करत नसल्याचं दाखवतात.

डोळे पिवळे होणं, सतत खाज येणं किंवा त्वचेवर काही विशिष्ट बदल दिसणं ही लक्षणं सिरोसिस, हिपॅटायटिस किंवा इतर गंभीर लिव्हरच्या आजारांकडे इशारा करू शकतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

त्वचा आणि डोळे पिवळे पडणं

लिव्हरच्या आजारांमध्ये सर्वाधिक ओळखलं जाणारं लक्षण म्हणजे कावीळ. आपल्या शरीरात लाल रक्तपेशींचं विघटन झाल्यानंतर बिलिरुबिन नावाचं पिवळ्या रंगाचं द्रव्य तयार होतं. हे द्रव्य शरीरातून बाहेर टाकण्याचे काम लिव्हर करतं. पण लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर बिलिरुबिन रक्तात साचू लागतं. त्यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसू लागतो.

त्वचेवर लाल रक्तवाहिन्या दिसणं

त्वचेवर लहान लाल रंगाच्या आणि कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसणाऱ्या रक्तवाहिन्यांना स्पायडर अँजिओमा असं म्हटलं जातं. या प्रामुख्याने चेहरा, मान, छाती किंवा हाताच्या वरच्या भागावर दिसतात. लिव्हर नीट काम करत नसल्यामुळे शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोनचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे अशा रक्तवाहिन्या तयार होतात.

तळहात लालसर होणं

काही लोकांच्या तळहाताचा रंग कायम लालसर दिसू लागतो. यामध्ये अंगठा आणि करंगळीच्या खालील भागात ही लालसरता जास्त जाणवते. या स्थितीला 'पाल्मर एरिथेमा' असं म्हणतात. लिव्हरच्या आजारामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि रक्तप्रवाहातील बदल यामुळे हे लक्षण दिसू शकतं.

कारण नसताना सतत खाज येणं

शरीरावर पुरळ किंवा त्वचेचा इतर कोणताही त्रास नसतानाही सतत खाज येत असेल तर ते लिव्हरच्या समस्येचं लक्षण असू शकतं. लिव्हर नीट काम करत नसल्यास पित्तातील काही घटक रक्तात साचतात. त्यामुळे अशी खाज येण्याची शक्यता असते.

गडद रंगाचे डाग दिसणं

चेहरा, डोळ्यांच्या आसपास, तोंडाभोवती किंवा काखेच्या भागात त्वचा अचानक काळसर होणं किंवा गडद रंगाचे चट्टे दिसू लागणं हेही लिव्हरच्या आजाराशी संबंधित असू शकतं. शरीरातील हार्मोन्समधील बदल, इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा त्वचेतील मेलॅनिनचं वाढलेलं प्रमाण यामुळे असे बदल दिसू शकतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळला; भूगर्भशास्त्रज्ञांसह २० जणांचा मृत्यू, ५ जण ढिगाऱ्याखाली

Satara Fort : घनदाट जंगलातून वाट काढत गाठा सह्याद्रीतील 'हा' अनोखा किल्ला, ट्रेकिंगप्रेमींसाठी खास ठिकाण

बदलापूर हादरले! साडी दिली नाही म्हणून पत्नीने केली पतीची हत्या; डोक्यात कुकर मारून घोटला गळा

Famous Actress Death : मनोरंजन विश्वाला धक्का, भीषण कार अपघातात १८ वर्षांच्या अभिनेत्रीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT