

हाय ब्लड प्रेशर ही अनेकांची सामान्य समस्या बनलीये. रक्तदाब सतत जास्त राहिल्यास हार्टच्या समस्या, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहारासोबत नियमित व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे.
रोज चालणं हा रक्तदाब कमी करण्याचा उत्तम मार्ग मानला जातो. मात्र चालण्याशिवायही असे काही व्यायाम आहेत जे तुमचं हृदय मजबूत ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. ब्लड प्रेशर आणि हृदयाचं आरोग्यच चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही कोणते व्यायाम करू शकता ते पाहूयात.
मैदानी भागात सायकल चालवणं किंवा जिममधील सायकल वापरणं, दोन्हीही हृदयासाठी फायदेशीर आहेत. सायकलिंगमुळे हृदय अधिक मजबूत होतं, शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि तणावही कमी होतो. आठवड्यातून 3 ते 5 दिवस किमान 30 मिनिटे मध्यम गतीने सायकल चालवण्याचा प्रयत्न करा.
पोहणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. विशेष म्हणजे सांध्यांवर जास्त ताण न देता हा व्यायाम करता येतो. नियमित पोहल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते, तणाव कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळतं.
डंबेल, मशीन किंवा रेझिस्टन्स बँडच्या मदतीने केलेला व्यायामही रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराचा चयापचय सुधारतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा संपूर्ण शरीराचा मध्यम तीव्रतेचा व्यायाम करा.
योगामध्ये शरीराची हालचाल, श्वासोच्छ्वासावर नियंत्रण आणि ध्यान यांचा समावेश असतो. त्यामुळे तणाव कमी होण्यास आणि रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते. ब्रिज पोझ, कॅट-काऊ पोझ, शवासन तसंच दीर्घ श्वसनाचे व्यायाम हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
नाचण्याची आवड असेल तर हा व्यायाम तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. झुंबा, साल्सा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा एरोबिक डान्स केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारतं, शरीर एक्टिव्ह राहते आणि रक्तदाब कमी करण्यास मदत मिळतं.
ताई ची हा कमी ताण देणारा व्यायाम आहे. यामध्ये संथ हालचाली आणि नियंत्रित श्वासोच्छ्वास यांचा वापर केला जातो. यामुळे शरीराचा तोल, लवचिकता आणि रक्ताभिसरण सुधारतं. तणाव कमी करण्यासही हा व्यायाम प्रभावी मानला जातो.
या प्रकारच्या व्यायामात काही सेकंद किंवा मिनिटं जोरदार व्यायाम केला जातो आणि त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली जाते. संशोधनानुसार, पारंपरिक व्यायामाच्या तुलनेत कमी वेळेत हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास HIIT मदत करू शकतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.