Blood Vessels: हृदयाच्या रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यावर रात्रीच्या वेळी पायांमध्ये ही 3 प्रमुख लक्षणं दिसतात

Surabhi Jayashree Jagdish

अयोग्य जीवनशैली

आजकाल दीर्घकाळ बसून काम करणं, नियमित व्यायाम न करणं आणि अपुरी झोप यामुळे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शारीरिक हालचाल कमी झाल्याने रक्ताभिसरण मंदावू शकते. परिणामी रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

Weak Arteries | SAAM TV

अयोग्य आहार

ट्रान्स फॅट, जास्त मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न वारंवार खाल्ल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर साचू शकतात. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद आणि कमी लवचिक होण्याचा धोका वाढतो.

Poor Blood Circulation | SAAM TV

मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धूम्रपान

मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे रक्तवाहिन्यांचं नुकसान करणारे प्रमुख जोखीम घटक आहेत. धूम्रपान आणि तंबाखूतील केमिकल्स रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला इजा पोहोचवतात आणि रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करू शकतात.

Leg Pain at Night | SAAM TV

वाढता ताण आणि लठ्ठपणा

सततचा मानसिक ताण शरीरातील ताणसंबंधित हार्मोन्स वाढवतो ज्याचा रक्तदाब आणि हृदयावर परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो.

Leg Cramps | SAAM TV

रात्री पायात गोळे येणं

हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यास किंवा रक्ताभिसरणात अडथळा निर्माण झाल्यास काही लोकांना रात्री पायांमध्ये वेदना किंवा गोळे येण्याची तक्रार होऊ शकते. विशेषतः चालल्यानंतर किंवा विश्रांतीच्या वेळी ही लक्षणं अधिक जाणवू शकतात.

Diabetes | SAAM TV

पाय थंड पडणं

रक्तपुरवठा कमी झाल्यास पाय नेहमीपेक्षा थंड वाटू शकतात किंवा मुंग्या येण्याची भावना निर्माण होऊ शकते. काही व्यक्तींमध्ये त्वचेचा रंग फिकट किंवा निळसर दिसू शकतो. तसंच जखमा भरून येण्यास जास्त वेळ लागू शकतो.

Obesity | SAAM TV

सूज येणं

हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यास रात्री झोपल्यानंतर किंवा संध्याकाळी पायांच्या घोट्यांमध्ये आणि पावलांमध्ये सूज दिसू शकते. यासोबत श्वास लागणं, थकवा किंवा छातीत अस्वस्थता जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Cardiovascular Health | SAAM TV

टीप

ही माहिती केवळ जागरूकता आणि सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी किंवा आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

blood sugar levels | saam tv

Liver Cancer: लिव्हरमध्ये कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात ही 3 विचित्र लक्षणं

numbness in legs | SAAM TV
येथे क्लिक करा