मुंबई : डोळ्यांना अधिक ताण दिल्यास आपल्याला अधुक दिसू लागते. त्यामुळे वारंवार आपल्याला डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
हे देखील पहा-
नजर कमकुवत होणे किंवा असणे हे काही येणाऱ्या पुढच्या पिढीत डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह नाही मात्र ही समस्या अनेक कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्यांपासून आढळून येते हे सुद्धा खरे आहे. इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीनुसार जगभरात २० लाखांहून अधिक लोकांना अनुवांशिक किंवा इतर कारणामुळे होणा-या रेटिनाच्या जनुकीय आजारांचा सामना करावा लागतो आहे आणि या स्थितीसाठी कारणीभूत ठरणा-या २७० जनुकांची ओळख पटली आहे. हा आजार डोळ्यावप परिणाम करुन मधुमेहामुळे दृष्टी धूसर करणारा व वयोमानामुळे जडणारा एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनमुळे होतो.
डायबेटिक रेटिनोपॅथी(डीआर )आणि त्याची पार्श्वभूमी
डायबेटिक रेटिनोपॅथी ही एक अशी स्थिती आहे, ज्यात रेटिनाची म्हणजेच नेत्रपटलातील रक्तवाहिन्यांची हानी होते. मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये डीआरची वारंवारता आणि तीव्रता वेगवेगळ्या प्रमाणात आढळून येते. काही रुग्णांमध्ये मधुमेह फारसा जुना नसला आणि साखरेवर उत्तम नियंत्रण असले तरीही डीआरची कमतरता ही उद्भवते तर काही रुग्णांच्या बाबतीत दीर्घकाळापासून मधुमेह किंवा दीर्घकालीन हायपरग्लायसेमिया असूनही त्यांच्यामध्ये डीआरची लक्षणे दिसून येत नाहीत. डीआर विकसित होण्याच्या बाबतीत दिसून येणा-या या असमानतेचे स्पष्टीकरण कदाचित जनुकीय फरकामध्ये सापडू शकेल. भारतामध्ये ७.३ कोटी हून अधिक लोक मधुमेहग्रस्त असून या रुग्णांमध्ये जनुकीय घटकांमुळे डीआरची स्थिती विकसित होण्याचा धोका वाढण्याची शक्यता ५० टक्के इतकी आहे.
पुण्याच्या एशियन आय हॉस्पिटलच्या ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉ. श्रुतिका कंकारिया म्हणातात, एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आणि डायबेटिक रेटिनोपॅथी या दोघांच्याही बाबतीत जनुकीय पूर्वप्रवृत्तींचा प्रभाव ३०-४० टक्के असण्याची शक्यता असते. या आजाराचा अनुवांशिकतेकडे कल आहे याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. हा आजार कुटुंबातील आधीच्या पिढ्यांमध्ये असेल तर येणाऱ्या पुढच्या पिढीला ही होण्याची शक्यता असते. त्यासाठी डोळ्यांचे (Eye) वेळोवेळी चेकअप करणे गरजेचे आहे.
जेनेटिक आणि एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन(एएमडी)
एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हा एक उत्तरोत्तर गंभीर स्वरूपाचा आजार आहे, जो रुग्णाच्या केंद्रीय दृष्टीवर परिणाम करतो. एएमडी असलेले सुमारे १५ टक्के ते २० टक्के लोकांच्या बाबतीत पालकांना किंवा त्याच्या मुलांना हा आजार असतो. बदलेली जीवनशैली, धूम्रपान, इतर वैद्यकीय स्थिती आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे हा आजार होण्याची शक्यता किंवा धोका निर्माण होतो. संशोधकांना एएमडीशी संबंधित ३० हून अधिक जनुके सापडली आहेत.
पुण्याचे ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉ. नितीन प्रभुदेसाई म्हणतात, एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आणि डायबेटिक रेटिनोपॅथी या दोन्ही आजारांमध्ये जनुकांची भूमिका असते. या आजारांची कोणतीही लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यांची ओळख पटविण्यासाठी अद्यापह कोणताच जीन मिळालेला नाही. जर कुटुंबामध्ये या आजारांचा पूर्वेतिहास असेल तर मधुमेहाचे निदान झाल्यावर रुग्णांना नेहमीच डोळ्यांची तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, एएमडीची शक्यता पडताळण्यासाठी वयाच्या पन्नाशीनंतर वार्षिक नेत्रतपासणी करून घेण्यास सांगितले जाते. मधुमेहाच्या परिणामकारक व्यवस्थापनाद्वारे डायबेटिक (Diabetes) रेटिनोपॅथी टाळता येऊ शकते, मात्र म्हातारपणी प्रत्येकालाच येणार असल्याने एएमडी ही एक अटळ परिस्थिती आहे.
रेटिनाच्या आऱोग्याकडे दुर्लक्ष केल्याने अस्वस्थता तर जाणवतेच पण ही स्थिती कायमच्या अंधत्वालाही कारणीभूत ठरू शकते. आपल्या कुटुंबामध्ये डोळ्यांच्या आजारांचा आधीपासून असेल तर आपल्या ऑप्थॅल्मोलॉजिस्ट्सचा सल्ला नियमितपणे घ्यायला हवा व त्यावर वेळोवेळी उपचार करायला हवे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.