Health tips : हृदयासाठी कोणते तेल अधिक फायदेशीर ठरेल !

कोणते तेल हृदयासाठी चांगले आहे?
Kitchen tips, which oil is best for heart health
Kitchen tips, which oil is best for heart healthब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरुक असतो. आपल्या आरोग्याला कोणते पदार्थ अधिक चांगले असतात याविषयी आपण खात्री करुन घेत असतो. आपल्या हृदयाच्या बाबतीत किंवा त्यासंबंधित आपल्याला काही आजार असेल तर आपल्याला त्याची अधिक काळजी असते.

हे देखील पहा -

आपण आपल्या स्वयंपाकघरात तेल निवडताना त्याच्या बदल परिपूर्ण माहिती घेत असतो. त्यात असणारे घटक याच्याविषयी डॉक्टरांचा सल्ला घेतो. अमेरिकन हेल्थ असोसिएशन (एएचए) कमी सच्युरेटेड फॅट व उच्च प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असलेल्या तेलांवर आहारात खाण्याचा सल्ला दिला गेला आहे. ज्यांना हेल्दी किंवा 'चांगले' फॅट्स देखील म्हटले जाते.

ऑलिव्ह ऑइल शरीरीसाठी आरोग्यदायी आहे?

स्वयंपाकघरातील पदार्थांसाठी ऑलिव्ह ऑइल हे आरोग्यदायी आहे. त्यात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूपच कमी असते आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असताना त्यात चांगले फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) भरपूर प्रमाणात असतात. या तेलामध्ये १४% सच्युरेटेड, ११% पॉलीअनसॅच्युरेटेड, जसे की ओमेगा-६ आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि ७३% मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आढळते. ऑलिव्ह ऑइलमधील मुख्य फॅटी ऍसिडला ओलिक ऍसिड म्हणतात, जे शरीरात होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. तसेच, ऑलिव्ह ऑइलमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे त्याचा फायदा हृदयाला होतो.

Kitchen tips, which oil is best for heart health
Kitchen tips : तव्यावरील गंज दूर करण्यासाठी ही युक्ती ट्राय करा

हृदयासाठी कोणते तेल चांगले नारळाचे की, ऑलिव्ह

हे तेल उष्ण असून त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. यात प्रतिजैविक प्रभाव असण्यापासून ते शरीरातील चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला घट्ट करण्यासाठी, नारळ तेल फायदेशीर ठरते. परंतु, ऑलिव्ह ऑइलच्या तुलनेत नारळाचे तेल आरोग्य आणि पौष्टिकतेच्या बाबतीत खास फायदे देऊ शकत नाही. यात असणाऱ्या घटकांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यात ८० ते ९० टक्के सॅच्युरेटेड फॅट असते, म्हणजे एक चमचा खोबरेल तेलामध्ये ऑलिव्ह ऑइलपेक्षा सहापट जास्त सॅच्युरेटेड फॅट असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कोणते तेल हृदयासाठी चांगले आहे?

हृदयाच्या आरोग्यासाठी ऑलिव्ह तेल (Oil) हे नारळाच्या तेलापेक्षा आणि स्वयंपाकात (Kitchen) वापरल्या जाणार्‍या इतर अनेक तेलांपेक्षा बरेच चांगले आहे. ऑलिव्ह ऑईल खराब कोलेस्टेरॉल कमी करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते, खोबरेल तेलात, उच्च प्रमाणात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढवते. ऑलिव्ह ऑइलचा आहारात समावेश केल्यास टाइप २ मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com