Pills Without a Prescription
Pills Without a Prescription Saam Tv
लाईफस्टाईल

Pills Without Prescription : तुम्ही देखिल प्रिस्क्रिप्शन शिवाय गोळ्या खाताय? होऊ शकतो शरिरावर दुष्परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Avoid Taking Pills Without a Prescription : धावपळीच्या या जीवनात, डोकेदुखी किंवा अंगदुखीची समस्या वारंवार थकव्यामुळे कायम राहते. अशा परिस्थितीत, वेदनांनी त्रस्त होऊन, त्यातून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेकदा पेन किलरचा सहारा घेतो. आजकाल बरेच लोक (People) दररोज पेन किलर वापरत आहेत.

पेन किलर म्हणजे वेदना नाशक औषध (Medicine). आजचे जीवन हे खूप धकाधकीचे आहे . सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात , या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते.

कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल. पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.

जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात? जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो . कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते, या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.

पेन किलर गोळ्यांमुळे होणारे नुकसान -

  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्या मुळे आपण वयस्कर दिसू लागतो.

  • रिकाम्या पोटी कधीही अशा गोळ्या घेऊ नका कारण यामुळे किडनी ( मूत्रपिंड ) संबंधी समस्या होऊ शकतात.

  • रोज घेतल्याने यकृत सबंधी समस्या उद्भवतात.

  • अशा गोळ्या रोज घेतल्याने आपल्याला घाबरल्या सारखे होते , निद्रानाश होते , तसेच अस्वस्थता वाढते.

  • पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो . काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता.

  • जेवल्यावर 30 मिनिटांनंतर ह्या गोळ्या घ्या.

  • पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.

  • जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टर चा सल्ला घ्या.

  • पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत.

  • पेन किलर च्या गोळ्या ह्या नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindu Religion: लग्नसंमारभात कोणत्या बोटाने टिळा लावावा?

Kalyan Lok Sabha : कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविरुद्ध अपक्ष लढाई; नेत्यानं श्रीकांत शिंदेंचं नावही घेतलं नाही!

Indoor Games: लहान मुलांना सुट्ट्यांमध्ये खेळण्यासाठी बैठे खेळ उत्तम; बुद्धीलाही मिळेल चालना

Nanded Accident: नांदेडमध्ये भरधाव ट्रकने ८ दुचाकी चिरडल्या, अपघातामध्ये दोघे ठार

LSG vs MI, IPL 2024: रोहित वाढदिवशी मुंबईला गिफ्ट देणार? लखनऊविरुद्ध टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT