Medicines : सावधान ! औषधं घेताय ? औषधे घेतल्यानंतर या पदार्थांचे सेवन करु नका

औषधे घेतल्यानंतर या चुका करु नका.
Medicines
MedicinesSaam Tv

Medicines : बदलेल्या जीवनशैलीनुसार, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण सतत आजारी पडतो व त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.

कामाच्या तणावामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजारपण ह्या समस्यांना सामोरे जावे लागते. या आजारपणाला सामोरे जाण्यासाठी आपल्या दिनचर्येत रोज व्यायाम आणि चांगल्या डाएट प्लॅनचा समावेश करायला हवा.

Medicines
Lemongrass Benefits : वाढत्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे रोज सेवन करा

आजारपणात आपल्याला जशी योग्य आहाराची आणि औषधांची गरज असते, तसेच डॉक्टरांच्या मते, औषधांसह काही पदार्थांचे सेवन करणे चुकीचे आहे. चला तर मग पाहूयात कोणते पदार्थ आपण घेतल्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.

१. हिरव्या भाज्या -

Green vegetables
Green vegetablesCanva

आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश असतो. ह्या भाज्यांमध्ये जीवनसत्व के असते. या जीवनसत्त्वाचे सेवन केल्यानंतर वॉर्फिन हे रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारे द्रव्य (anticoagulant) शरीरात तयार होतात. त्यामुळे औषधे घेत असताना आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश थोड्या प्रमाणात असावा असे डॉक्टर सांगतात.

२. ग्रीन टी -

Green Tea
Green TeaCanva

आपल्या दैनंदिन जीवनाची सुरवात चहाने होते. चहाचे प्रमाण सध्या फार वाढत चालले आहे. चहाच्या प्रकारांमध्ये ग्रीन टी ही ट्रेंडिंग (Trending) मध्ये दिसते पण औषधांसोबत याचे सेवन करणे टाळले पाहिजे, असे डॉक्टरांनी सांगितले. ग्रीन टी प्यायल्यानंतर औषधांबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन आपल्याला एसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

३. मद्यपान -

Beer
Beer Canva

आहार तज्ज्ञांच्या मते, मद्यपान केल्यावर किंवा करण्याआधी औषधं (Medicine) घेऊ नये. त्याने पित्ताशयावर वाईट परिणाम होतो. दीर्घकाळ औषधे आणि मद्यपान यांच्या मिश्रणाने शरीराच्या इतर भागांवर सुध्दा परिणाम होतो. याशिवाय ब्लड प्रेशर नियंत्रित करणारी औषधे मद्यपाना सोबत अजिबात घेऊ नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com