Lemongrass Benefits : वाढत्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे रोज सेवन करा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हे करुन पहा
Lemongrass benefits
Lemongrass benefitsSaam Tv
Published On

Lemongrass Benefits : कोलेस्ट्रॉल हा रक्तातील एक घटक आहे. त्याच्या वाढण्यामुळे शरीरावर चांगले व वाईट असे दोन्ही प्रकार दिसून येतात.

शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आहेत. गुड कोलेस्ट्रॉल HDL (high-density lipoprotein) व दुसरे बॅड कोलेस्ट्रॉल (low-density lipoprotein) असे म्हटले जाते.

Lemongrass benefits
Seven nutritionist: तुम्हालाही पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होतात का ? अशावेळी आरोग्याची काळजी कशी घ्याल ? कसा असावा आहार? जाणून घ्या

चांगले कोलेस्ट्रॉल हृदयासाठी फायदेशीर असते. यामुळे रक्तातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. त्याच वेळी, खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. या स्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

साधारणपणे, शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी 200 mg/dl पेक्षा कमी असावी. यापेक्षा जास्त कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समजून येते. यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. जर आपल्यालाही वाढते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर आपण लेमनग्रासचा वापर करु शकतो. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया. (Benefits Of Lemongrass)

लेमनग्रास -

लेमनग्रास हे गवत आहे. जे भारताव्यतिरिक्त आशियातील काही देशांमध्ये आढळते. हे औषध म्हणूनही वापरले जाते. याचा सुवास लिंबू सारखा असल्यामुळे याचा चहा बनवला जातो. यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-फंगल औषधी गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

कर्करोगासारख्या (Cancer) घातक आजारावर याचा अधिक फायदा होतो. तसेच मच्छरांना पळवण्यासाठी आपण घरात लेमनग्रासचा वापर करु शकतो. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लेमनग्रास फायदेशीर आहे. यामध्ये गेरानिऑल आणि टेरपेनॉइड संयुगे आढळतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रण कमी करण्यास मदत करतात.

सेवन कसे करावे

Lemongrass Tea
Lemongrass TeaCanva

आपण लेमन ग्रास चहा बनवून याचे सेवन करू शकतो. विशेषत: सकाळी लेमन ग्रास चहा प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे (Benefits) होतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, सर्दी-खोकल्यात आराम मिळतो, कॅन्सर आणि पोटाशी संबंधित आजारांवर फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर रोज लेमन ग्रास चहा प्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com