Seven Nutritionist Food : ऋतूमानातील बदलानुसार आपल्या शारीरिक जीवनात बदल घडत असतात त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काही आहारात आपण बदल करायला हवा.
पावसाळा सुरू झाला की अतिसार, फ्लू व इतर संसर्गजन्य रोग पसरू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया.
अशा बदलत्या वातावरणात आपल्या आरोग्यासाठी तज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर सात मान्सून सुपरफूड्स (seven monsoon superfoods) कोणते याविषयी सांगितले. हे आपण पाहूया.
१. सातू -
चणा डाळ, गहू आणि तांदळाच्या पिठाचे एकत्रीकरण म्हणजेच सातू. यात कॅल्शियम, खनिजे, फॉलिक ऍसिड यांसारखी जीवनसत्त्वे आणि लाइसिन सारखी अत्यावश्यक अमीनो ऍसिड आहेत. यात आपल्या शरीराला अत्यावश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी उपलबध्द आहेत.
दिवेकरांच्या मते, लोकांनी सातूचे सेवन करावे कारण,
- हे मासिक पाळीच्या वेळी पोटातील दुखणे आणि गुठळ्या कमी करते.
- डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात.
- पिगमेंटेशन आणि केस गळणे कमी करते.
२. मक्का / कणीस -
मक्का खाल्याने केस गळती नियंत्रणात राहाते. मक्का भाजून किंवा उकडून आपण खाऊ शकतो. तसेच त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील आपण बनवू शकतो.
हे महत्वाचे आहेत कारण,
- कॉस्टिपेशन पासून मुक्त करणारे फायबर असते.
- रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयोग होतो.
- जीवनसत्वे बी आणि फॉलिक अॅसिड यात असते.
३. अळू -
मोठ्या हिरव्या पानांची पालेभाजी आणि पावसाळ्यात उगवलेल्या अनेक जंगली भाज्यांपैकी आहे. यात लोह जास्तीचे आढळते. आपली त्वचा तजेलदार दिसण्यासाठी उपयुक्त ठरते. यात असणारे सूक्ष्म पोषक तत्वे वृध्दापणाची चिन्हे टाळण्यास मदत करतात. हायलुरोनिक ऍसिड (HA)हे दृष्टीच्या समस्यांवर मदत करते, सांध्यांचे संरक्षण करते आणि हे विशेष संधिवातामध्ये उपयुक्त आहे.
अळू हे आपल्याला गुळगुळीत, निर्दोष, चमकदार रंग व केसांचे (Hair) सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करते.
४. खजूर -
सकाळी उठल्यावर, दुपारच्या जेवणानंतर आपण खजूराचे सेवन करु शकतो. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास याच्या सेवनाने फायदा होतो. मुलांच्या डब्ब्याचा एक भाग होऊ शकतो. विशेषतः जर ते तारुण्य गाठत असतील तर त्यांच्यासाठी महत्वाचे आहे.
खजूरच्या सेवनाने -
- हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.
- झोपेच्या विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
- बहुतेक संक्रमण आणि ऍलर्जींशी लढा देते.
- व्यायामाची कार्यक्षमता वाढवते.
५. नाचणी -
नाचणीत असणारे पोषक घटक मणक्याला बळकट करण्यास मदत करते. नाश्त्यासाठी आपण याच्या सत्वाचा वापर दुधात भिजवून करु शकते. हे प्रत्येक हेल्थ ड्रिंक लहान मुलांसाठी आवश्यक आहे , त्याच्या पौष्टिक घटकांमुळे उंचीमध्ये वाढ होते आणि ताकद वाढते.
- त्याचे वाफवलेले गोळे बनवा आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खा.
- गूळ आणि खोबरे घालून लाडू बनवा.
- चटणीबरोबर नाचणी डोसा म्हणून घ्या.
- चपाती सारखे बनवा आणि भाजी बरोबर खा.
आपल्याकडे पाच वर्षांखालील मुले असल्यास, त्यांना या पदार्थांची आधीच ओळख करून दिली जाते. वजन कमी करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांसाठी नाचणी उत्तम आहे.
६. फणसाच्या बिया -
बहुतेक हिरव्या भाज्याचा समावेश आपल्या आहारात नसतो. परंतु काही बियांमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजांचा पुरवठा अधिक आहे. त्यातील एक फणासाची बी.
फणसाच्या बियांची भाजी किंवा करी आपण भाताबरोबर खाऊ शकतो. स्वादिष्ट स्नॅकसाठी ते काही मीठ आणि मिरपूड घालून वाफवलेले किंवा भाजून खाऊ शकतात.
त्यात पॉलिफेनॉल असतात जे आपल्या त्वचेचे तारुण्यपण टिकवून ठेवण्यास मदत करते. झिंक आणि इतर सूक्ष्म पोषण तत्वे जे प्रजनन क्षमता आणि हार्मोनल आरोग्यास चालना देतात. फायबर, राइबोफ्लेविन आणि जीवनसत्व बी यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करतात, रक्तातील साखरेचे (Sugar) नियंत्रण सुधारतात आणि आतड्यांचा जळजळ कमी करते.
७. कडधान्ये -
कडधान्य खाण्याचे तीन नियम आहेत -
नियम १. अन्नातील पोषक घटक कमी करण्यासाठी व आपली पचनसंस्था सुधारण्यासाठी कडधान्याचा वापर आहारात करण्यापूर्वी त्यांना भिजवून किंवा मोड आणा.
नियम २. अत्यावश्यक अमीनो ऍसिडचे गुणोत्तर सुधारण्यासाठी त्यांना बाजरी आणि इतर धान्यांमध्ये मिसळणे.
नियम ३. विविध प्रकारचे कडधान्ये आहारात असणे आणि सर्व पोषक घटकांचे सेवन करण्यासाठी त्या वेगवेगळ्या स्वरूपात घेणे आवश्यक आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.