Sleeping On Stomach Saam Tv
लाईफस्टाईल

Sleeping On Stomach : तुम्हालाही पोटावर झोपण्याची सवय आहे ? पडू शकते महागात जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

Stomach Health : झोपताना प्रत्येक व्यक्तीची पोझिशन वेगवेगळी असते. अनेक लोकांच संबंध आहे की, त्यांना पोटावर झोपून आराम मिळतो.

कोमल दामुद्रे

Stomach Pain : झोपताना प्रत्येक व्यक्तीची पोझिशन वेगवेगळी असते. अनेक लोकांच संबंध आहे की, त्यांना पोटावर झोपून आराम मिळतो. जरी तुम्हाला ही पोझिशन आरामदायी वाटत असली तरी. अशा पोझिशनमध्ये झोपल्यावर तुम्हाला दीर्घकाळासाठी नुकसान होऊ शकते.

यापासून वाचण्यासाठी तुम्हाला योग्य पोझिशनमध्ये झोपणे अत्यंत गरजेचे आहे. एक्सपर्ट या गोष्टीबद्दल सांगतात की, पोटावर झोपल्याने शरीरामधील अंतरीक अंगावरती दबाव पडतो. ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे (Pain) वाढतात. जाणून घेऊया शरीराला नुकसान कसे होते.

1. झोपेमध्ये होतात या गोष्टी :

तुम्हाला पोटावरती झोपून फ्लेक्स वाटत असेल. परंतु अशा स्थितीमध्ये झोपणे हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. एक्सपर्ट सांगतायेत की, पोटावरती झोपल्याने रीढचे हाड स्थिर राहत नाही. पूर्ण वजन शरीराच्या मध्यभागी येते. रीढच्या हाडाला योग्य पोझिशन न मिळाल्याने शरीरामधील वेगवेगळ्या अंगांना दुखणे उद्भवते.

2. मान आणि खांद्यांमध्ये दुखू लागते :

पोटावरती झोपल्याने खांदे आणि मान पूर्णपणे रिलॅक्स नाही करू शकत. ज्यामुळे मानेच्या मासपेशींमध्ये ओढताना होऊ शकते. हेल्थ एक्सपर्टचं म्हणणं आहे की, पोटावरती झोपल्याने सनक निघते आणि हात पाय सुन्न पडणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. जर पूर्ण रात्र पोटावरती झोपले गेले तर, काही अंग निष्क्रिय होऊन जातात.

Sleeping On Stomach

3. गर्भावस्थेमध्ये अजिबात झोपू नका :

ज्या महिला प्रेग्नेंट असतात त्यांनी पोटावरती अजिबात झोपू नये. पोटावरती झोपणे हे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या बाळासाठी अतिशय हानिकारक ठरते. त्याचबरोबर अनेक सर्जरींमध्ये पोटावरती झोपल्याने आपले नुकसान होते.

4. स्लीप एपनीयापासून फायदा (Benefits) :

बऱ्याचदा अनेक हेल्थ (Health) एक्सपर्ट सांगतात की, पोटावरती झोपल्याने स्लीप एपनिया आणि घोरणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला रात्री झोपताना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर, तुम्ही पोटावरती झोपू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT