Avoid death heart attack saam tv
लाईफस्टाईल

Avoid death heart attack: हार्ट अटॅक आल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा 'हे' काम; डॉ.छाजेर यांनी सांगितला मृत्यूला टाळण्याचा उपाय

What to do within 2 minutes of heart attack : हृदयविकाराचा झटका हा एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग आहे, ज्यामध्ये तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. जर हार्ट अटॅक आलाच, तर तातडीने काय करावे हे जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा अयोग्य आहारामुळे हृदयासंबंधीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. याचं कारण म्हणजे त्वरित उपचार न मिळणे. बऱ्याचदा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच व्यक्तीचा मृत्यू होतो. तर प्रथमोपचाराने काही काळासाठी हृदयविकार टाळता येतो.

मात्र अनेकांना हृदविकाराचा झटका आल्यानंतर काय करावं हा प्रश्न पडतो. याबाबत मबीबीएस, एमडी डॉक्टर बिमल छाजेर यांनी राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली आहे की, हृदयविकारामुळे होणारे मृत्यू बऱ्याच प्रमाणात कसे टाळता येतात. यावेळी डॉ. छाजेर यांनी त्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती दिलीये.

हार्ट अटॅक कसा येतो?

हृदयाला ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हे सहसा रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्यामुळे होतं. जे चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साठून राहतात. जेव्हा हे प्लाक फुटते तेव्हा ते रक्ताच्या गुठळ्या तयार करतं जे रक्त हृदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचण्यापासून रोखतं. परिणामी हृदयविकाराचा झटका येतो.

हार्ट अटॅकची लक्षणं काय दिसून येतात?

हृदयविकाराच्या वेळी, छातीत वेदना, जडपणा, दाब जाणवू लागतो. ही वेदना छातीपासून सुरू होऊन डाव्या हाताला, खांद्याला, मानाला, जबड्याला, पाठीला किंवा कंबरेत पसरू शकते.

हार्ट अटॅक आल्यानंतर काय करावं?

हृदयरोग तज्ञ डॉ. छाजेर यांनी स्पष्ट केलं की, हृदयविकाराचा झटका म्हणजे धमन्यांमध्ये गुठळी तयार झाली आहे. ती तोडण्यासाठी, डिस्प्रिन, क्लोपीडोग्रेल आणि एटोरवास्टॅटिन या ३ औषधांचे मिश्रण द्यावं.

यावेळी धमनीमध्ये तयार झालेली गुठळी विरघळवण्यासाठी, १ डिस्प्रिन, २ क्लोपीडोग्रेल आणि १ अ‍ॅटोरवास्टॅटिन टॅब्लेट चावून खा. किंवा पाण्यात विरघळवून प्या. यामुळे हार्ट अटॅकमुळे येणारा मृत्यूचा धोकाही कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर विरोधात ढाणकी शहर कडकडीत बंद

किडनी स्टोनच्या रुग्णांनी काय खावे आणि काय काय खाऊ नये?|Kidney Stone Diet Tips

Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Kaju Katli Recipe: खास कार्यक्रम किंवा सणासुदीसाठी घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट काजू कतली; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT