Raviwar Upay saam tv
लाईफस्टाईल

Raviwar Upay: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; जीवनातील प्रत्येक समस्येपासून मिळेल मुक्तता

Sunday remedies for problems: सूर्यदेव हे ऊर्जा, यश, मान-सन्मान आणि आरोग्याचे प्रतीक मानले जातात. असे मानले जाते की, या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न केल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्याला सुख-समृद्धी मिळते.

Surabhi Jayashree Jagdish

  • रविवार सूर्यदेवाला समर्पित दिवस मानला जातो.

  • अर्गला स्तोत्राचे पठण सुख-शांती देणारे आहे.

  • पिवळ्या कपड्यावर शत्रूचे नाव लिहून देवापुढे ठेवावे.

हिंदू धर्मानुसार, प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. त्याचप्रमाणे रविवारचा दिवस सूर्यदेवाला अर्पण केलेला मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. असं मानलं जातं की ही उपासना मनोभावे केल्यास ती फलदायी ठरते. म्हणूनच रविवारच्या दिवशी भगवान भास्करांना अर्घ्य म्हणून जल अर्पण केलं पाहिजे.

केवळ एवढंच नव्हे तर जीवनातील अनेक संकटांपासून मुक्त होण्यासाठीही रविवार हा शुभ मानला जातो. अशावेळी रविवारच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊया.

सुख-शांती आणि मनोकामना पूर्णीसाठी

जीवनात समाधान आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर रविवारच्या दिवशी अर्गला स्तोत्र वाचावं. हे स्तोत्र दुर्गासप्तशती मध्ये मिळतं. पुस्तक नसेल तर इंटरनेटवरून सहज मिळते.

शत्रूवर विजय मिळवण्यासाठी

जर कुणी शत्रू त्रास देत असेल तर रविवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचा कपडा घ्यावा आणि हळद पाण्यात घोळून त्या द्रावणाने कपड्यावर शत्रूचं नाव लिहावं. नंतर हा कपडा विष्णुमंदिरात नेऊन भगवानाच्या चरणी ठेवावा.

जीवनसाथीच्या प्रगतीसाठी

पती किंवा पत्नीच्या उन्नतीसाठी रविवारच्या दिवशी पोपटाला हिरवी मिरची खाऊ घालावी. शक्य नसेल तर पोपटाचे मोठे चित्र आणून घराच्या उत्तर दिशेला लावून त्याचं दररोज दर्शन करावं.

विशेष इच्छापूर्तीसाठी

जर तुमच्या मनात एखादी खास इच्छा असेल तर रविवारच्या दिवशी शिव-गौरी आणि गणेशजींच्या पूजेदरम्यान पाण्यात हळदीची गाठी घासून तयार केलेल्या लेपाने स्वस्तिकाचं चिन्ह काढावं. यामध्ये उरलेली हळद कपाळावर लावावी.

नोकरीत बढती मिळवण्यासाठी

जर नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल आणि संघर्ष चालू असेल तर रविवारच्या दिवशी विष्णुमंदिरात जाऊन भगवानाला पिवळं वस्त्र अर्पण केलं पाहिजे. शक्य असल्यास स्वतःच्या हाताने तयार केलेलं कपडे अर्पण करावं.

अपघात व अनिष्ट घटना टाळण्यासाठी

रविवारच्या दिवशी गहू आणि ज्वारीच्या पिठाची चपाती तयार करून बनवून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात जाऊन एखाद्या कामगाराला द्यावी.

रविवारचा दिवस कोणाला समर्पित आहे?

रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे.

सुख-शांतीसाठी रविवारी कोणते स्तोत्र वाचावे?

अर्गला स्तोत्र वाचावे.

शत्रूवर विजय मिळवण्यासाठी काय करावे?

पिवळ्या कपड्यावर शत्रूचे नाव लिहून विष्णुमंदिरात ठेवावे.

पती-पत्नीच्या प्रगतीसाठी रविवारी काय करावे?

पोपटाला हिरवी मिरची खाऊ घालावी.

अपघात टाळण्यासाठी रविवारी काय करावे?

गहू-ज्वारीची चपाती नैऋत्य कोपऱ्यात कामगाराला द्यावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makyacha Chivda Recipe: दिवाळीसाठी कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा कसा बनवायचा?

Mumbai-Ahmedabad Highway: अवजड वाहनांच्या 15 किलोमीटरपर्यंत रांगा; चौथ्या दिवशीही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

Dangers of eating quickly: घाईघाईत जेवणाची सवय तुम्हालाही आहे का? शरीरात सुरू होतो ‘हे’ धोकादायक बदल

Language Conflict : भाषावाद पेटला; हिंदी चित्रपट आणि गाण्यावर बंदी घालणार? दक्षिण भारतातील राज्य मोठा निर्णय घेणार

Silver Rate: चांदीच्या किंमती ३ लाखांचा पल्ला गाठणार, दिवाळीच्या सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार, तज्ज्ञांचं नेमकं म्हणणं काय?

SCROLL FOR NEXT