Laxmi Mata google
लाईफस्टाईल

Shukrawar Upay: शुक्रवारच्या दिवशी करा हे उपाय; घरात धन-धान्यासोबत पैसाही येईल

Friday remedies for money: हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार हा दिवस धन-समृद्धीची देवी माता लक्ष्मी आणि ऐश्वर्य, सौंदर्य यांचा कारक ग्रह शुक्र यांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जर शुक्र ग्रह कमजोर असेल, तर व्यक्तीला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते.

Surabhi Jayashree Jagdish

  • शुक्रवार हा लक्ष्मीमातेचा दिवस आहे.

  • पिंपळाची पाने हनुमानजींना अर्पण करावीत.

  • तांदूळ भरलेला कलश मंदिरात दान करावा.

शुक्रवार हा लक्ष्मीमातेचा दिवस मानला जातो. या दिवशी काही सोपे आणि परिणामकारक उपाय केल्यास जीवनात सुख-समृद्धी, शांती आणि प्रगती प्राप्त होण्यास मदत होते. नोकरीतील अडचणी दूर होतात, संपत्तीची वाढ होते आणि दाम्पत्य जीवनात आनंद टिकून राहतो. आजच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत ते पाहूयात.

इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय

जर तुमची एखादी मनोकामना खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी ११ पिंपळाची पानं घेऊन हनुमान मंदिरात जा. त्या ठिकाणी हनुमानजींच्या चरणांवरील सिंदूर प्रत्येक पानावर लावा आणि प्रत्येक वेळी आपल्या इच्छेचा उच्चार करा. नंतर ती पाने हनुमानजींना अर्पण करा.

घर-जमीन मिळवण्यासाठी उपाय

ज्यांना घर किंवा जमीन हवी आहे त्यांनी शुक्रवारच्या दिवशी हनुमान मंदिरात लाल रंगाचा चोला अर्पण करावा. देवाला प्रार्थना करा. असं केल्यास आयुष्यात घर-जमीन मिळण्याचे भाग्य लाभते.

सौभाग्य वाढवण्यासाठी उपाय

आपलं नशीब उजळवायचं असेल तर शुक्रवारच्या दिवशी १ रुपयाचं नाणं मंदिरातील लक्ष्मी मातेपुढे ठेवा. देवीची आणि त्या नाण्याची नीट पूजा करा. पूर्ण दिवस ते नाणं मंदिरात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी लाल कापडात बांधून जवळ ठेवा. हा उपाय तुमच्या सौभाग्यात भर घालतो.

आरोग्य सुधारण्यासाठी उपाय

नाभीजवळ वारंवार त्रास होत असल्यास शुक्रवारच्या दिवशी सव्वा किलो गूळ आपल्या नाभीला स्पर्श करून मंदिरात दान करा. असं केल्याने नाभीसंबंधी आजार दूर होतात.

कार्यात यश मिळवण्यासाठी उपाय

शुक्रवारी लाल कपड्यात थोडी मसूर डाळ बांधून हनुमान मंदिरात दान करा. यामुळे तुमच्या कार्यात यश निश्चित होते.

भावंडांचा सहयोग मिळवण्यासाठी उपाय

जर तुमच्या कामात भावंडांचा पाठिंबा मिळत नसेल, तर शुक्रवारी मंदिरात साखर दान करा. यामुळे भावंडांकडून सहकार्य मिळू लागते.

भाग्य खुलवण्यासाठी उपाय

आपल्या मेहनतीतून भाग्य उजळवायचे असेल, तर शुक्रवारी चॉकलेटी रंगाचा शर्ट किंवा वस्तू आपल्या मोठ्या भावाला किंवा भाऊसमान व्यक्तीला भेट द्या. हा उपाय भाग्यप्राप्तीला सहाय्यकारी ठरतो.

आनंद मिळवण्यासाठी उपाय

शुक्रवारी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. लक्ष्मीमातेपुढे प्रार्थना करा. उजव्या हातात फुल घेऊन ते देवीपुढे ठेवा, त्यावर तुपाचा दिवा लावा आणि देवीला लाल ओढणी अर्पण करा. हा उपाय जीवनात आनंद आणतो.

धनवृद्धीसाठी उपाय

शुक्रवारी एका छोट्या मातीच्या कलशात तांदूळ भरा. त्यावर १ रुपयाचे नाणं आणि हळदीची गाठी ठेवा. झाकण लावून तो कलश मंदिरातील पुजाऱ्याला दान करा. असं केल्याने धनवृद्धी होते.

इच्छा पूर्णतेसाठी शुक्रवारी काय उपाय करावा?

११ पिंपळाची पाने सिंदूर लावून हनुमानजींना अर्पण करावीत.

घर-जमीन मिळवण्यासाठी कोणते दान करावे?

लाल रंगाचा चोला हनुमान मंदिरात अर्पण करावा.

सौभाग्य वाढवण्यासाठी कोणते नाणे ठेवावे?

१ रुपयाचे नाणे मंदिरात ठेवून जवळ ठेवावे.

धनवृद्धीसाठी कोणता उपाय फायदेशीर आहे?

तांदूळ, नाणे आणि हळदीची गाठी असलेला कलश दान करावा.

भावंडांचा सहयोग मिळवण्यासाठी काय दान करावे?

शुक्रवारी मंदिरात साखर दान करावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT