How to remove negative energy from home saam tv
लाईफस्टाईल

Shukrawar Upay: शुक्रवारी पौर्णिमेच्या दिवशी करा 'हे' उपाय; घरातील नकारात्मक उर्जा होईल दूर

How to remove negative energy from home: ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा शुक्रवार आणि पौर्णिमा एकाच दिवशी येतात, तेव्हा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शुक्रवार हा धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी यांना समर्पित आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • शुक्रवार लक्ष्मीमातेचा प्रिय दिवस मानला जातो.

  • पौर्णिमेच्या शुक्रवारी विशेष उपाय फलदायी ठरतात.

  • लक्ष्मीला जिरे, हळद, धन अर्पण करावे.

हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस विशेष मानला जातो कारण तो धनाची देवी माता लक्ष्मी यांना अर्पण केलेला असतो. या दिवशी विधीपूर्वक लक्ष्मीमातेची पूजा केल्यास शुभ फळ मिळतं, असं मानलं जातं. यंदा हा शुक्रवार आणखी खास आहे, कारण याच दिवशी पौर्णिमाही आहे. अशा शुभ योगात काही खास उपाय केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मीमातेची विशेष कृपा प्राप्त होते, जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी वाढते.

चला तर जाणून घेऊया शुक्रवारच्या या पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय केल्याने तुम्हाला फायदे मिळण्याची शक्यता आहे.

धनवृद्धीसाठी करा हा उपाय

शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करताना त्यांना लाल रंगाचा वस्त्र किंवा साडी, हळद, दुर्वा, थोडं धन आणि जिरं अर्पण करावं. जिर्‍याऐवजी तुम्ही कच्चा तांदूळही अर्पण करू शकता. हे उपाय फारच शुभ मानण्यात आले आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरातील हळद आणि धन घरी आणून पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.

जिरे उचलून स्वयंपाकघरातील जिरे ठेवलेल्या डब्यात मिसळा. हे लक्षात ठेवा की हा डबा कधीच रिकामा होऊ नये. असं केल्याने लक्ष्मीमातेची कृपा घरावर सतत राहते.

सुख-शांती आणि समृद्धीसाठी करा हा उपाय

शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करताना खीरचा नैवेद्य अवश्य दाखवा. आणि कारण पौर्णिमा आहे म्हणून संध्याकाळी चंद्राला खीर अर्पण करा. शक्य असल्यास खीरमध्ये थोडंसं केशर घाला.

हा उपाय केल्यास घरातील तणाव आणि अडचणी कमी होतात. सुख-शांती टिकून राहते आणि यशाचे नवीन मार्ग उघडतात. असं मानलं जातं की, लक्ष्मीमातेचा खीरचा नैवेद्य प्रसन्नता निर्माण करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

मनोकामना पूर्ण होण्यासाठी करा हा उपाय

पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी चंद्रदर्शन करताना दूधाने अर्घ्य द्या आणि त्याच वेळी चंद्राच्या मंत्राचा जप करा. हे केल्याने वैवाहिक आयुष्यातील ताणतणाव कमी होतो आणि नवरा-बायकोचं नातं अधिक घट्ट होतं.

शुक्रवार आणि पौर्णिमा एकत्र आल्यामुळे या दिवशी हा उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात, अडकलेली कामं सुरू होतात आणि गृहकलह दूर होतो. कुटुंबात प्रेम, एकोपा आणि समाधान निर्माण होतं.

लक्ष्मी आणि विष्णूंची विशेष कृपा मिळवण्यासाठी उपाय

शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीमातेची आरती करताना कपूर आणि लवंग वापरा आणि ही आरती तुळशीला दाखवा. यामुळे लक्ष्मी-विष्णूंचा आशीर्वाद घरावर टिकून राहतो.

तसंच, जीवनात प्रगती हवी असेल तर लक्ष्मीमातेला गुलाबाचे फूल अर्पण करा आणि हे फूल चढवताना खालील मंत्र म्हणावा — “ॐ कमले कमलालये प्रसीद प्रसीद”

शुक्रवारचा दिवस कोणाला समर्पित आहे आणि का?

शुक्रवारचा दिवस धनाची देवी लक्ष्मीमातेला समर्पित आहे. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता मिळते.

धनवृद्धीसाठी शुक्रवारी कोणता उपाय करावा?

लक्ष्मीमातेला लाल वस्त्र, हळद, जिरे किंवा कच्चा तांदूळ, आणि थोडं धन अर्पण करावे. दुसऱ्या दिवशी हे घरी आणून पर्समध्ये ठेवावे.

सुख-शांतीसाठी खीरचा नैवेद्य का शुभ मानला जातो?

खीर हा लक्ष्मीमातेचा प्रिय नैवेद्य आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला खीर अर्पण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि तणाव कमी होतो.

मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणता उपाय करावा?

पौर्णिमेच्या सायंकाळी चंद्राला दूधाने अर्घ्य द्यावा आणि चंद्र मंत्राचा जप करावा. यामुळे मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.

लक्ष्मी-विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी कोणते विशेष उपाय करावेत?

लक्ष्मीमातेची आरती तुळशीला दाखवावी, कपूर आणि लवंग वापरावी. तसेच गुलाबाचे फूल अर्पण करून “ॐ कमले कमलालये प्रसीद प्रसीद” हा मंत्र म्हणावा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : तारेवरचे कपडे काढताना अनर्थ घडला; विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Lapandav Serial: स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार 'लपंडाव'; 'ही' मालिका अखेर घेणार प्रेक्षकांचा निरोप

Prajakta Mali: युनिव्हर्सिटी टॉपर ते टीव्ही होस्ट; प्राजक्ता माळीचा प्रेरणादायी प्रवास

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी ६ ग्रह येणार एकत्र; दुर्मिळ संयोगाचा ३ राशींना होणार भरपूर फायदा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT