Budhwar Upay: गणपती बाप्पाचा एक अचूक मंत्र आणि समस्या होतील दूर; बुधवारच्या दिवशी हे उपाय करायला विसरू नका

Wednesday Astro remedies: हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेने केली जाते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात, म्हणजे ते भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतात.
Budhwar Upay
Budhwar Upaysaam tv
Published On
Summary
  • बुधवार हा गणपती पूजेसाठी शुभ दिवस आहे.

  • गूळ आणि सिंदूर अर्पण करणे बाप्पाचे प्रिय आहे.

  • २१ दूर्वा अर्पण केल्यास गणपती लवकर प्रसन्न होतात.

बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. बुध ग्रहाचा संबंध वाणी, व्यापार आणि बुद्धीशी आहे. त्यामुळे या दिवशी केलेली गणेशपूजा विशेष फलदायी ठरते. जो भक्त या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा करतो, त्याचे जीवनातील संकट दूर होतात आणि कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संपतात.

गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करतो मात्र बुधवारच्या दिवशी काही खास उपाय केल्यास बाप्पा अधिक प्रसन्न होतात. इतकंच नाही तर आपल्या कुंडलीमधील बुध ग्रहही बळकट होतो. चला जाणून घेऊया बुधवारचे हे सोपे उपाय कोणते आहेत आणि त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर कसा पडतो.

बाप्पाला गूळाचा नैवेद्य दाखवा

बुधवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा करावी आणि नैवेद्य म्हणून बाप्पाला गूळ अर्पण करावा. असं केल्यास फक्त गणपतीच नव्हे तर लक्ष्मीमाताही प्रसन्न होते. अशा घरात कधीच धन किंवा अन्नाची कमतरता राहत नाही.

Budhwar Upay
Turmeric Remove Remedy- कपड्यांवरील हळदीचे डाग काढण्याच्या या पद्धती तुम्हाला माहिती आहेत का?

गणपतीला २१ दूर्वा अर्पण करा

बुधवारच्या दिवशी तुम्ही दुर्वांचा उपाय देखील करू शकता. यावेळी बाप्पाची पूजा करताना त्यांना २१ दूर्वा अर्पण केल्यास बाप्पा लवकर प्रसन्न होतात. हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो.

गायीला हिरव्या गवताचं दान करा

बुधवारी जर गायीला हिरवं गवत खायला घातलं किंवा गोशाळेत गवतासाठी पैसे दान केले, तर तुमच्या जीवनात आर्थिक प्रगती होईल. शिवाय हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

दुर्गामातेची आराधना करा

बुधवारी जर दुर्गामातेची पूजा केली, तर जीवनातील निम्म्यापेक्षा अधिक अडचणी कमी होतात. बुधदोष दूर करण्यासाठी एका मंत्राचा १०८ वेळा जपही करू शकता.

Budhwar Upay
Shukrawar Upay: शुक्रवारच्या दिवशी 'हे' उपाय तुम्हाला करतील मालामाल; कामातील अडथळेही होतील दूर

गणपतीला सिंदूर अर्पण करा

बुधवारच्या दिवसी सिंदूरचा उपाय फार प्रभावी मानला जातो. या दिवशी पूजा करताना बाप्पाला सिंदूर अर्पण केल्यास लाभ होतो. हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यशाचे मार्ग खुलतात.

रत्न धारण करा

ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार बुधवारी सर्वात लहान बोटीत ‘पन्ना’ रत्न घातल्यास बुध ग्रह बळकट होतो. त्यामुळे व्यवसाय आणि पैशांशी संबंधित त्रास कमी होतात.

Budhwar Upay
Mangalwar upay: मंगळवारच्या दिवशी करा हे उपाय; मंगळ दोष दूर होऊन कर्जापासूनही मिळेल मुक्तता

मंत्र जप करा

बुधवारी गणपतीचे काही विशिष्ट मंत्र जपल्यास जीवनातील समस्या कमी होतात. हे मंत्र आहेत –

“ॐ गं गणपतये नमः” किंवा “श्री गणेशाय नमः” या मंत्रांचा श्रद्धेने जप केल्यास मानसिक शांती आणि यश प्राप्त होते.

Q

बुधवारचा दिवस गणपती पूजेसाठी का शुभ मानला जातो?

A

बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस असून, त्याचा संबंध बुद्धी, वाणी आणि व्यापाराशी आहे. या दिवशी गणपती पूजा केल्याने बुद्धीमत्ता आणि यश मिळते.

Q

बुधवारी गणपतीला कोणता नैवेद्य दाखवावा?

A

बुधवारी गणपतीला गूळ नैवेद्य म्हणून अर्पण करावा. यामुळे लक्ष्मीमाता आणि गणपती दोघेही प्रसन्न होतात.

Q

गायीला हिरवे गवत देण्याचा काय फायदा आहे?

A

बुधवारी गायीला हिरवे गवत दिल्याने आर्थिक प्रगती होते आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते.

Q

बुध ग्रह बळकट करण्यासाठी कोणते रत्न घालावे?

A

ज्योतिषानुसार, बुधवारी लहान बोटात 'पन्ना' (पेन्ना) रत्न घातल्यास बुध ग्रह बळकट होतो आणि व्यापारात यश मिळते.

Q

बुधवारी गणपतीचा कोणता मंत्र जपावा?

A

बुधवारी “ॐ गं गणपतये नमः” किंवा “श्री गणेशाय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे मानसिक शांती आणि यश मिळते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com