Makar Sankranti 2023 Upay  Saam Tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti 2023 Upay : कुंडलीतील सूर्य ग्रहाला अधिक मजबूत करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी करा 'हे' उपाय, होईल वर्षभर धनलाभ !

या दिवशी स्नान आणि दानासह सूर्यदेवाची पूजा करण्याचा विधी आहे.

कोमल दामुद्रे

Makar Sankranti 2023 Upay : मकर संक्रांत हा वर्षातील पहिला मोठा सण मानला जातो. यंदा मकर संक्रांतीचा सण १४ नाही तर १५ जानेवारीला साजरा होत आहे. या दिवशी स्नान आणि दानासह सूर्यदेवाची पूजा करण्याचा विधी आहे.

असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमजोर असेल तर तो मकर संक्रांतीच्या दिवशी काही खास उपाय करू शकतो. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते शुभ उपाय करावे लागतात.

ज्योतिष्यशास्त्राच्या मते, यंदा मकर संक्रांतीचा सण रविवारी साजरा होत आहे. अशा स्थितीत या दिवशी सूर्याशी संबंधित उपाय केल्यास अनेक पटींनी अधिक फळ मिळते.

मकर संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करा

  • मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी गाय किंवा वासरू दान करावे. असे केल्याने कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होईल.

  • मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यासाठी तांब्याच्या भांड्यात पाण्यासोबत (Water) थोडे काळे तीळ, सिंदूर, लाल फुले (Flower) टाकून अर्घ्य द्यावे.

  • संक्रांतीच्या दिवशी तीळ, खिचडी इत्यादी दान करा. या वस्तूंचे दान केल्याने सूर्याची स्थिती मजबूत होईल.

  • संक्रांतीच्या दिवशी गूळ आणि तांदळाची खीर भगवान सूर्याला अर्पण करावी. नंतर प्रसाद म्हणून घ्या.

Makar Sankranti
  • संक्रांतीच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करताना या मंत्रांचा जप करता येतो. मंत्र- 'ओम ह्रीं ह्रीं सा: सूर्याय नमः' आणि 'ओम घृणि: सूर्य आदिव्योम'.

  • मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याची विधिवत पूजा करण्यासोबत आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT