Yoga For Glowing Skin saam digital
लाईफस्टाईल

Yoga For Glowing Skin: सतेज आणि चमकदार चेहरा पाहिजे? रोज करा ही योगासन

Yoga for Skin: सर्वांना असं वाटत असते की आपला चेहरा नेहमी चमकदार आणि आकर्षित दिसावा. परंतु काही काळानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास सुरुवात होते आणि चेहरा खराब होऊ लागतो. मात्र कपालभाति, उत्तानासन, शीर्षासन और बालासनही काही योगासने आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yoga Tips

सर्वांना असं वाटत असते की आपला चेहरा नेहमी चमकदार आणि आकर्षित दिसावा. परंतु काही काळानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येण्यास सुरुवात होते आणि चेहरा खराब होऊ लागतो. मात्र कपालभाति, उत्तानासन, शीर्षासन और बालासनही काही योगासने (Yoga asanas)आहेत,जी नियमित केल्याने शरीतील हार्मोन्सचे संतुलन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मात्र चेहरा चमकदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी कोणती योगायने नियमित केली पाहिजे..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तारुण्यात चेहऱ्यावर पिंपल्स(Pimples) आल्याने चेहरा खराब दिसू लागतो.त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी अनेक जण ब्युटी प्रोडक्सचा वापर करतात. पंरतु ब्युटी प्रोडक्सच्या वापराने काही काळासाठीच चेहऱ्यावर ग्लो राहतो आणि नंतर पुन्हा चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते.त्यावर उपाय म्हणजे काही योगायने तुम्ही दररोज केली पाहिजेत.

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यास 'ही' योगासने ठरतात फायदेशीर

योगासने केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहु शकतो.योगासने केल्याने शरीर तंदरुस्त राहते.चेहऱ्यावर येणारे पिंपल्स आणि पडणाऱ्या सुरकुत्या देखील नाहीशा होतात.त्यामुळे योगासने हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. रोज सकाळी योगसने केल्याने आपण दिवसभर फ्रेश फिल करतो,तसेच थकवा देखील जाणवत नाही.

मत्स्यासन : या योगासनाचा नियमित सराव केल्याने थायरॉईड पाइनल आणि पिट्यूटरी ग्रंथीं सुधारते असे झाल्यास ते चेहऱ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

सर्वांगासन: सर्वांगासनच्या नियमित सराव केल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होऊन. त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पुरळपासून आराम मिळतो

उत्तानासन: उत्तानासन केल्याने त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

हलासन: हलासन केल्याने पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील चमक वाढवते.एवढेच नाही तर पोटासंबंधी विकार देखील या आसनामुळे नाहीसे होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT