Lord Shiva remedies business problems saam tv
लाईफस्टाईल

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Monday Shiva remedies: सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असलेला दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शिवाची मनोभावे पूजा आणि काही सोपे उपाय केल्यास ते लवकर प्रसन्न होतात, भक्तांच्या अडचणी दूर करतात.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मात सोमवारचा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित केला जातो. या दिवशी विशेष पूजा, व्रत आणि उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. जेव्हा सोमवारला शुभ नक्षत्र जसं की अनुराधा नक्षत्र लागलेलं असतं, तेव्हा या उपायांचं महत्व अधिकच वाढतं. शनिदेव या नक्षत्राचे अधिपती असल्यामुळे योग्य कर्म केल्यास त्यांच्या कृपेने आयुष्यभर फळ मिळू शकते.

आजचा सोमवार ‘अनुराधा’ नक्षत्रात आहे. हे नक्षत्र शुभ मानलं जातं आणि त्याचे स्वामी शनिदेव आहेत. शनिदेव कर्माचे फळ देणारे देव आहेत. माणसाचे चांगले–वाईट कर्म त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. ते चांगल्या कर्मांना आशीर्वाद देतात आणि चुकीच्या कर्मांचं फळही नक्की देतात.

व्यापारात भरभराट

जर तुम्हाला व्यापारात सतत नुकसान होत असेल, मनात नवा निर्णय घेण्याचं धैर्य राहत नसेल, तर कोणतंही नवीन काम सुरू करताना दोन पांढऱ्या फुलांना आपल्या जवळ ठेवा. काम पूर्ण झाल्यानंतर हे फुल वाहत्या पाण्यात सोडा. यामुळे धनलाभ होण्यास सुरुवात होते.

स्वातंत्र्य हवं असल्यास उपाय

आर्थिक, मानसिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या बंधनांपासून मोकळं व्हायचं असेल, तर आजच्या दिवशी मौलश्रीच्या झाडाची पूजा करा. तुमच्या आसपास हे झाड नसेल, तर त्याचा फोटो इंटरनेटवरून मिळवा. हे केल्यास जीवनात स्वातंत्र्याची अनुभूती येते.

अभ्यासात यश मिळवायचं असेल तर

जर तुम्ही अभ्यास चांगला करता, पण परीक्षेच्या वेळी विसर पडतो, किंवा खूप मेहनत घेऊनही यश मिळत नसेल, तर चांदीचा एक छोटासा चौरस तुकडा कायम आपल्या खिशात ठेवा. यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि मेहनतीचं योग्य फळ मिळतं.

वैवाहिक नात्यात गोडवा

दांपत्य नातं सुंदर आणि समजूतदार असावं असं वाटत असेल, तर बाजारातून हत्तीची मूर्ती आणा आणि ती शोकेसमध्ये किंवा बेडरूममधील टेबलवर ठेवा. हे केल्याने पती-पत्नीमधील नातं गोड राहील.

घरात सुख-समृद्धी हवी आहे?

जर तुम्हाला तुमच्या घरात धन, धान्य आणि सर्व भौतिक सुखांमध्ये वाढ हवी असेल, तर आज आंघोळ करून जवळच्या शिवमंदिरात जा. तिथे गंगाजल मिसळलेलं पाणी शिवलिंगावर अर्पण करा. दोन्ही हात जोडून प्रार्थना करा. हे उपाय तुमच्या आयुष्यात भरभराट घेऊन येतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT