Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Devshayani Ekadashi 2025: हिंदू धर्मात आषाढी देवशयनी एकादशीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेसाठी जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते.
Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashisaam tv
Published On

आज ६ जुलै असून आषाढी एकादशी आहे. शिवाय आजच्या दिवशी देवशयनी एकादशी साजरी केली जात आहे. हिंदू पंचांगानुसार, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात आणि त्यांचं चार महिन्यांचं विश्रामकाल सुरू होतो, ज्याला चातुर्मास असं म्हणतात.

या चार महिन्यांत कोणतेही मांगलिक कार्य जसे की विवाह, मुंडन, वास्तुशांती, गृहप्रवेश या गोष्टी केल्या जात नाहीत. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की, जसं देवतांमध्ये श्रीकृष्ण श्रेष्ठ, स्त्रियामध्ये प्रकृती श्रेष्ठ, वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, तसं व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वश्रेष्ठ मानलं जातं.

देवशयनी एकादशी ही केवळ व्रत करण्याची नाही तर आध्यात्मिक उन्नती, पापांपासून मुक्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी उत्तम संधी असते. याच दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम मिळतो. आज आषाढी आणि देवशयनी एकादशीला कोणते उपाय करायचे ते पाहूयात.

विष्णू सहस्रनामाचं पठण

सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. नंतर घरातील देवघरात किंवा मंदिरात भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर दिवा लावून विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. असं मानलं जातं की, या पाठामुळे लक्ष्मीचा वास घरात टिकतो.

श्रीहरिंचा पंचामृताने अभिषेक करा

या दिवशी भगवान विष्णू किंवा शालग्राम शिलाचा पंचामृताने (दूध, दही, तूप, मध, गंगाजल) अभिषेक केल्यास ते विशेष फलदायी मानलं जातं. अभिषेकानंतर चंदन, तुलसीदल आणि पिवळी फुलं अर्पण करा. हा उपाय गरीबीपासून मुक्ती देतो आणि सौभाग्य वाढवतो.

Ashadhi Ekadashi
Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा

संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्या समोर बसून विष्णू मंत्र "ॐ नमो भगवते वासुदेवाय" याचा जप करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, मानसिक शांतता मिळण्यास मदत होते.

गरजू लोकांना छत्री आणि पाणी वाटा

देवशयनी एकादशी हा दिवस सहसा पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात येतो. त्यामुळे या दिवशी छत्री, पाण्याच्या बाटल्या, चप्पल यांचा गरजू लोकांना दान करणं फार पुण्यांचं कारण मानलं जातं.

Ashadhi Ekadashi
Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

विष्णूंना केळी आणि पिवळी फुलं अर्पण करा

भगवान विष्णूंना केळी आणि पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावीत. या दोन्ही वस्तू श्रीहरिंना अतिशय प्रिय आहेत. असं केल्याने घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो आणि आर्थिक स्थैर्य लाभतं.

Ashadhi Ekadashi
Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com