Monday Shiva remedies money marriage problems saam tv
लाईफस्टाईल

Monday Remedies: सोमवारच्या दिवशी करा ही 5 कामं; नशीब चमकण्यासोबत हाती पैसा मिळणार

Monday Astrological Remedies: हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सोमवार हा दिवस भगवान शंकर आणि चंद्र देव यांना समर्पित आहे. अशी मान्यता आहे की, या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात

Surabhi Jayashree Jagdish

  • सोमवार हा भगवान शिवाचा दिवस आहे.

  • शिवलिंगावर दूध-पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

  • तुपाचा दिवा लावल्याने धनलाभ होतो.

हिंदू धर्मात भगवान शिव यांना प्रेम आणि शक्तीचा देव मानलं जातं. धार्मिक ग्रंथांनुसार जो कोणी श्रद्धेने आणि भक्तीभावाने भोलेनाथाची पूजा करतो, त्याच्या आयुष्यात सुख-शांती येते आणि मृत्यूनंतर मोक्षप्राप्तीही होते. विशेषत: सोमवार हा दिवस शिवपूजेकरिता अत्यंत शुभ मानला जातो.

अशी मान्यता आहे की भगवान शिवांना फक्त एक लोटा पाणी अर्पण केल्यानेही ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तावर कृपा करतात. जर तुम्हालाही शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर सोमवारी काही खास उपाय केल्यास त्याचे उत्तम फळ मिळतं. ज्योतिषशास्त्रात अशा अनेक उपायांचा उल्लेख केलेला आहे. हे उपाय कोणते आहेत ते पाहूयात.

धनसंपत्तीशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी

जर तुम्ही आर्थिक तंगीचा सामना करत असाल तर सोमवारी रात्री शिवमंदिरात जाऊन शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा. हा उपाय सलग ४१ सोमवार केला, तर धनाशी निगडित अडचणी दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी

सोमवारी शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि घरात शांती, समाधान आणि भरभराट वाढते. नियमितपणे पूजा केली, तर जीवनात सकारात्मक बदल जाणवतात.

नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी

जर नोकरीत किंवा व्यवसायात वारंवार अडथळे येत असतील तर सोमवारी शिवलिंगावर मध अर्पण करा. या उपायाने करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुलतात आणि व्यवसायातही चांगला फायदा होतो.

कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी

जर एखाद्या महत्त्वाच्या कामात वारंवार अडचणी येत असतील, तर सोमवारी बेलपत्र, धतुरा, दूध आणि पाणी याने शिवलिंगाचे अभिषेक करा. या उपायाने अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते.

घरातील कलह आणि भांडण कमी करण्यासाठी

घरात वारंवार भांडण किंवा तणाव होत असेल, तर सोमवारी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीला एका वाटी तांदूळ दान द्या. या उपायाने घरातील वातावरण शांत होतं आणि कुटुंबात आनंद-समाधान वाढतं.

सोमवारी शिवपूजेसाठी कोणता दिवा लावावा?

तुपाचा दिवा लावल्याने शिव जलद प्रसन्न होतात.

आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोणता उपाय करावा?

सलग ४१ सोमवार तुपाचा दिवा लावावा.

नोकरीत यश मिळवण्यासाठी कोणती वस्तू अर्पण करावी?

शिवलिंगावर मध अर्पण करणे करिअरमध्ये फायदेशीर आहे.

घरातील तणाव कमी करण्यासाठी काय करावे?

बेलपत्र अर्पण करून तांदूळ दान करावे.

शिवलिंगाचे अभिषेक कोणत्या वस्तूंनी करावे?

दूध, पाणी, मध, बेलपत्र आणि धतुरा यांनी अभिषेक करावा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dupatta Draping Styles: गरब्याला लेहेंग्यासोबत ओढणी कशी करायची स्टाईल जाणून घ्या सोपी पद्धत?

Pak vs Ban : पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशनं उतरवली तगडी टीम, ३ बदल केले; जिंकणार तो थेट भारताविरुद्ध फायनल खेळणार

Central Government: राज्यावर पुराचं संकट; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Men Periods: पुरुषांनाही मासिक पाळी येते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Shocking : महापालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाईमुळे तरुणाची आत्महत्या; ४ महिन्याचं बाळ झालं पोरकं

SCROLL FOR NEXT