Car Driving Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Car Driving Tips : कमी उंची असणाऱ्यांनो कार चालवताना येताय समस्या ? मग 'हे' उपाय नक्की करा

बऱ्याच अपघातांमध्ये त्याचं कारणं ही लोकांची उंची असल्याचं समोर आलं आहे.

कोमल दामुद्रे

Car Driving Tips : वाहतुकीचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. यात कुणालाही सुट नाही. अशात सर्व नियम पाळून वाहन चालवताना देखील अनेकवेळा अपघात होतात. यावेळी बऱ्याच अपघातांमध्ये त्याचं कारणं ही लोकांची उंची असल्याचं समोर आलं आहे.

कमी उंची असलेल्या व्यक्तींना चारचाकी वाहन चालवताना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतं. मुळात उंची कमी असल्याने चारचाकीचे बोनेट नीट दिसत नाही. त्यामुळे आपण नीट चालवतोय की, नाही असा प्रश्न पडतो.

बोनेट दिसत नसल्याने किंवा अर्धवट दिसत असल्याने वाहन (Car) चालवताना शेजारी असलेली वाहने आपल्या गाडी जवळ आलेत की, नाही ते पटकन लक्षात येत नाही.

अनेक व्यक्ती चारचाकी वाहन चालवताना या तक्रारी करतात. मात्र अशा वेळी काय करायला हवे याचे काही सोपे पर्याय आहेत. याने तुम्हाला वाहन चालवताना कोणतीही अडचण येणार नाही. पर्याय म्हटल्यापेक्षा याला जबरदस्त जुगाड म्हटलं तरी चालेल.

कारण असे उपाय केल्याने तुमच्याकडून कोणताही दंड घेतला जाणार नाही. तसेच त्याने तुमच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे (Rules) उल्लंघन देखील होणार नाही.

चार चाकी वाहन चालवताना जर तुम्ही एसयूव्ही कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. या कारची सिस्टीम अशी आहे की, यात तुम्ही स्वतः च्या उंचीनुसार जागा पुढे मागे करून अडजेस्ट करू शकता याने गाडीचे बोनेट देखील स्पष्ट दिसते.

Car Driving Tips

यासह जर तुमची कार इतर कोणत्या कंपनीची (Company) असेल तर तुम्ही उंची वाढवण्यासाठी एखाद्या उशीचा वापर करू शकता. सीटवर उशी, लाकूड किंवा अन्य कोणतीही वस्तू ठेवून वाहन चालवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. यामध्ये तुम्ही तुमचे पाय ब्रेकवर कसे राहतील याने देखील नीट व्यवस्था करू शकता.

वाहन चालवताना वाईपर देखील चांगल्या स्थितीत म्हणजेच संपूर्ण दिसेल असे ठेवावे. अनेक वेळा उशी किंवा अन्य कोणत्याही वस्तूच्या वापर करून जेव्हा तुम्ही नीट बसण्याचा प्रयत्न करता तेव्हा वाईपर नीट दिसत नाही किंवा त्यामुळे बाहेरील दृश्य नीट दिसण्यास अडचणी येतात. त्यामुळे याची देखील काळजी घ्यायला हवी. असे केल्यास कमी उंची असलेल्या व्यक्तींना देखील वाहन चालवताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागतं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday in November : नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी...

PSI Gopal Badne: महिला डॉक्टरवर चारवेळा बलात्कार करणारा कोण आहे PSI गोपाल बदने? VIDEO

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पावसाचा हाहाकार

Sachin Sanghvi Arrested: २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला अटक

धक्कादायक! वयाच्या २३व्या वर्षी अभिनेत्रीने सोडले प्राण; 'या' गंभीर आजारामुळे मृत्यू, सिनेसृष्टीत हळहळ

SCROLL FOR NEXT